अमरावती - महाशिवरात्रीच्या पर्वावर श्रीक्षेत्र कोंडेश्वर येथे भाविकांची गर्दी उसळली आहे. अमरावती शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर हे ( Kondeshwar temple in Amaravati ) तीर्थक्षेत्र आहे. निसर्गाच्या कुशीत असलेल्या कोंडेश्वर मंदिराला प्राचीन महत्त्व आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या हजारो वर्ष जुने हे मंदिर आणि मंदिराचा परिसर ऋषीमुनींच्या आणि साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झाला ( Mahashivratri celebration in Amaravati ) आहे.
कुणकेश्वर मंदिराला प्राचीन महत्त्व
हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनी आणि साधुसंतांचे वास्तव्य कोंडेश्वर परिसरात( Ancient temple in Amaravati ) होते. पाषाणात हे मंदिर उभारण्यात आले आहे. हत्तीचे कलात्मक स्वरूप नंदी राज, कैलास टेकडी, तलाव अशा विविध रुपांनी हा परिसर धार्मिक महात्मासोबतच ( Kunakeshwar temple in Amaravati ) निसर्गरम्य आहे.
हेही वाचा-Chandrakant Patil : 'नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही'
अशी झाली मंदिराची स्थापना
विदर्भ राज्याच्या वाट्याला आलेला प्रदेश म्हणजे विदर्भ आहे. विदर्भ राजा हा काशी क्षेत्रातील ब्रह्मावर्ताचा मूळनिवासी आहे. तो शिवभक्त होता. विदर्भ राजाने स्थापत्यविशारद कौंडीन्य मुनींना काशीवरून पाचारण करून पाच हजार वर्षांपूर्वी आपल्या नव्या विदर्भ प्रदेशात भगवान शंकराच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा केली. या कौडीन्य मुनीच्या नावावरूनच महादेवाला कोंडेश्वर असे नाव देण्यात आले. भगवान कोंडेश्वराच्या वास्तव्याने हा परिसर पावन झाला . यादव राज्याचे पंतप्रधान हे मांजरी पंथ यांनी कोंडेश्वर आजचे हेमाडपंथी रचनेचे मंदिर बांधून दिल्याची आख्यायिका आहे. ही आख्यिका मंदिराचे विश्वस्त रामकृष्ण डोळे यांनी ई टीव्हीभारत शी बोलताना सांगितले.