महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vidarbha Weather Update : विदर्भवासी कुडकुडले; भर दुपारी पेटल्या शेकोट्या - विदर्भ पावसाळा बातमी

विदर्भातील जिल्ह्यांत थंडी कायम ( Vidarbha Cold Wave ) आहे. काही दिवसांपासून विदर्भातील काही भागांत गारपीट आणि पाऊस पडला. तर आता थंडीची लाट आली आहे.

Vidarbha Weather Update
Vidarbha Weather Update

By

Published : Jan 15, 2022, 1:27 PM IST

Updated : Jan 15, 2022, 3:40 PM IST

अमरावती - विदर्भातील अनेक जिल्ह्यात थंडीची लाट ( Vidarbha Cold Wave ) आली आहे. शुक्रवारी सकाळी विदर्भातील अनेक भागात कुठे तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस कोसळला. शनिवारी सुद्धा अनेक भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तर कडाक्याच्या थंडीमुळे अमरावती शहरात ( Amravati Cold Wave ) भर दुपारीही अनेक भागात शेकोटी पेटवून नागरिक थंडीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे आहे थंडीचे कारण

मकर संक्रांती पासून थंडी कमी होते असे म्हटले जाते. मात्र, या वर्षी मकर संक्रांतीला आज विदर्भात कडाक्याची थंडी पडली. याबाबत श्री शिवाजी कृषी हवामान केंद्राचे प्राध्यापक अनिल बंड यांनी ई टिव्ही भारतशी बोलताना सांगितले की, "हवेच्या खालच्या थरात अंतर्गत कर्नाटक ते उत्तर ओरिसापर्यंत कमी दाबाची द्रोनी स्थिती तसेच दक्षिण कोकण वर चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात बहुतेक जिल्ह्यात तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडला आहे. वाशीम, वर्धा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मध्य प्रदेशात थंडीची लाट राहणार असल्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा विदर्भातील वातावरणावर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्री शिवाजी कृषी हवामान केंद्राचे प्राध्यापक माहिती देताना

गहू हरभऱ्याच्या पिकांना फायदा

गारपीट आणि पावसामुळे विदर्भातील तुरीला काही प्रमाणात फटका बसला आहे. मात्र, आता पावसाची शक्यता नसल्यामुळे आणि अनेक शेतकऱ्यांनी तुरही काढल्याने शेतकऱ्यांना विशेष असे नुकसान होणार नाही.गहू आणि हरभरा साठी हे वातावरण अतिशय पोषक असून शेतकऱ्यांना कुठलीही काळजी करण्याची गरज नसल्याचेही प्राध्यापक अनिल बंड यांनी सांगितले.

अमरावतीत शुक्रवारचे तापमान

किमान - 16 डिग्री सेल्सिअस

कमाल - 19 डिग्री सेल्सिअस

विदर्भात शनिवारचे किमान तापमान

अमरावती - 14 डिग्री सेल्सिअस

अकोला - 14.1 डिग्री सेल्सिअस

बुलढाणा - 14 डिग्री सेल्सिअस

चंद्रपूर - 16.8 डिग्री सेल्सिअस

नागपुर - 15 डिग्री सेल्सिअस

गोंदिया - 12.5 डिग्री सेल्सिअस

गडचिरोली - 13.8 डिग्री सेल्सिअस

वर्धा - 15.2 डिग्री सेल्सिअस

वाशिम - 12 डिग्री सेल्सिअस

यवतमाळ - 14.5 डिग्री सेल्सिअस

हेही वाचा -Skulls Found in Biogas Wardha : बायोगॅसमधून मिळाली 12 वी कवटी; तपासासाठी विशेष पथकाची स्थापना

Last Updated : Jan 15, 2022, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details