समाजामध्ये खोटे गोष्टी पसरवण्यासाठी भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर खेळी अमरावती Rohit Pawar On BJP : मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ओबीसी समुदायातील असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या चर्चेला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं एक जात प्रमाणपत्र कारणीभूत ठरलंय. हे जात प्रमाणपत्र शरद पवारांचं असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी समाजामध्ये खोटे गोष्टी पसरवण्यासाठी भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर खेळी खेळल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला.
काय म्हणाले रोहित पवार :याप्रकरणी आज (13 नोव्हेंबर) अमरावतीत माध्यमांशी संवाद साधत असताना रोहित पवार म्हणाले की, समाजामध्ये खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी भाजपानं एक स्वतंत्र टीमच तयार केली आहे. ज्या माध्यमातून नको त्या गोष्टी आणि द्वेष समाजामध्ये पसरवण्याचं काम भाजपा करतंय. यासाठी या कार्यकर्त्यांना भाजपाकडून मोठ्या प्रमाणात भरीव निधी दिला जातो. भाजपाला सत्य पटत नाही. खोट्या मार्गाचा वापर करूनच ते सत्तेत आलेत. सत्तेचा घर मार्गाने वापर करून उन्माद करणं हेच भाजपाचं खरे काम आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांना दिसत नाहीत.
ही सगळी देवेंद्र फडणवीसांची खेळी : पुढं ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय. त्यामुळंच सर्वसामान्यांचे मुख्य प्रश्न बाजूला सारून जनतेला भरकटण्याचं काम भाजपाकडून होत आहे. ही सगळी रणनीती नागपूरकर तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आखत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसंच सध्या सोशल मीडियावरून शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला फिरत आहे. तो खोटा आहे. याबाबतीत आमचे नेते योग्य ते स्पष्टीकरण माध्यमाकडं येऊन सादर करतील, अशी माहितीही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला आला समोर :शरद पवार यांचं ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचं खोटं सर्टिफिकेट व्हायरल झाल्यानंतर ते खोटं असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते विकास पासलकर यांनी केला होता. तसंच विकास पासलकर यांनी शरद पवारांचा शाळा सोडतानाचा दाखला समोर आणला. या प्रमाणपत्रावर 'मराठा' असा उल्लेख दिसत आहे.
हेही वाचा -
- Vikas Lawande On Sharad Pawar : 'नामदेव जाधव तोतया'; शरद पवार मराठा की ओबीसी, पाहा काय म्हणाले विकास लवांडे
- Sharad Pawar On Diwali : पवारांची दिवाळी! माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येतात,संकटांना तोंड द्यावं लागतं - शरद पवार, पाहा व्हिडिओ
- Rohit Pawar On Beed Riots : बीडमधील घटना प्रोफेशनल आंदोलकांनी केली; आमदार रोहित पवार यांचा आरोप