महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनलॉक ५: महाराष्ट्र एक्सप्रेसचा चांदूर रेल्वे स्टेशनवरील थांबा रद्द, रेल रोको समिती आक्रमक

मागणी पूर्ण न केल्यास आंदोलनचा इशारा नितीन गवळी यांच्या नेतृत्वात देण्यात आला आहे. चांदूर रेल्वे स्टेशनवर लॉकडाऊन आधी महाराष्ट्र एक्सप्रेसचा थांबा होता. परंतु, अनलॉक ५ मध्ये या थांब्यावर महाराष्ट्र एक्सप्रेस थांबवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र एक्सप्रेस सर्व स्टेशनवर पूर्ववत थांबत असताना केवळ चांदूर रेल्वे स्टेशनवरच तिचा थांबा रद्द करण्यात आला आहे. यामागे कोविडचे कारण देण्यात आले आहे.

रेल रोको समिती
रेल रोको समिती

By

Published : Oct 17, 2020, 5:12 PM IST

अमरावती- टाळेबंदीनंतर सुमारे साडेसहा महिन्यानंतर प्रवासी गाड्या (आरक्षित) हळूहळू सुरू केल्या जात आहेत. अशातच गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस दररोज सुरू झाली असून यामध्ये मात्र अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे स्टेशनचा थांबा रद्द करण्यात आला आहे. यामुळे रेल रोको कृती समिती आक्रमक झाली असून थांबा पूर्ववत सुरू करण्याची मागणी रेल रोको कृती समितीने स्टेशन प्रबंधक मार्फत जीएम व डीआरएम यांना आज पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

माहिती देताना नितीन गवळी

मागणी पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा नितीन गवळी यांच्या नेतृत्वात देण्यात आला आहे. चांदूर रेल्वे स्टेशनवर लॉकडाऊन आधी महाराष्ट्र एक्सप्रेसचा थांबा होता. परंतु, अनलॉक ५ मध्ये या थांब्यावर महाराष्ट्र एक्सप्रेस थांबवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र एक्सप्रेस सर्व स्टेशनवर पूर्ववत थांबत असताना केवळ चांदूर रेल्वे स्टेशनवरच तिचा थांबा रद्द करण्यात आला आहे. यामागे कोविडचे कारण देण्यात आले आहे.

कोविडचे कारण संयुक्तिक वाटत नसल्याचे रेल रोको कृती समितीने म्हटले आहे. तसेच, सदर थांबा रद्द करणे हा चांदूर रेल्वे तालुक्यावर अन्याय आहे. चांदूर रेल्वे व परिसरातील नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी या रेल्वेगाडी शिवाय दुसरी कुठलीही गाडी नाही. त्यामुळे, सदर रेल्वेगाडीचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा-व्यापाऱ्याला घडले माणुसकीचे दर्शन... रिक्षावाल्याने पैशांची बॅग केली परत

ABOUT THE AUTHOR

...view details