अमरावती- संत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता सरकारला मार्गदर्शक आहे. त्यांच्या ग्रामगीतेप्रमाणे सरकार चालावे, अशी आमची इच्छा आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. आज अमरावतीच्या गुरूकूंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमधीचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते.
'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेप्रमाणे सरकार चालावे' - बाळासाहेब थोरात अमरावती
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज अमरावतीच्या गुरूकूंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमधीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले, संत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता सरकारला मार्गदर्शक आहे. त्यांच्या ग्रामगीतेप्रमाणे सरकार चालावे. अशी आमची इच्छा आहे.
balasaheb thorat
अमरावती हा संतांची भूमी असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्यात संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांसारखे संत होऊन गेले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ग्रामगीता ही सर्वांना मार्गदर्शक ठरणारी आहे. या ग्रामगीतेप्रमाणे सरकार चालावे, अशी इच्छा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.