अमरावती - घरासमोर लाल पाण्याची बाटली ठेवल्यास कुत्रे घाण करीत नसल्याचा समज ग्रामीण-भागासह शहरी भागात देखील पाहायला मिळत आहे. मात्र, कुत्र्यांना लाल आणि हिरव्या रंगाचे ज्ञान नसते. त्यामुळे ही सर्व अंधश्रद्धा असल्याचे अंनिस कार्यकर्ते अंकुश वाघ सांगतात.
कुत्र्याला लाल रंगाचे ज्ञानचं नाही, तर कुत्रे लाल पाण्याला का घाबरतील - अंनिस - जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी
कुत्र्याला लाल रंगाचे ज्ञानचं नाही, तर कुत्रे लाल पाण्याला का घाबरतील, असे अंनिस कार्यकर्ते अंकुश वाघ म्हणाले. त्यामुळे ही फक्त अंधश्रद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्याचा वावर ठिकठिकाणी पाहायला मिळतो. काही कुत्रे अनेकांच्या घरासमोरील अंगणात घाण करीत असतात. त्यामुळे घरमालक त्रस्त झाले. त्यासाठी लाल पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्रे घाण करीत नाहीत, असे एकाने सुचवले. त्यानंतर दुसरा, तिसरा असे करता करता सर्वत्र ही अंधश्रद्धा पसरत गेली. तसेच कुत्र्याला फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे ज्ञान असते. त्यामुळे ही केवळ अंधश्रद्धा असल्याचे किशोर रहाटे जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी सांगतात.