अमरावती - कोरोनाच्या संकटामुळे नागरिक धास्तावले असताना जिल्ह्यात आता जनावरांवर लंपी स्किन या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. या संकटातून जनावरांना वाचवण्यासाठी जिल्हा पशु संवर्धन विभागाद्वारे पहिल्या टप्प्यात 50 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यापैकी 47 हजार 888 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
अमरावतीत 14 पैकी 11 तालुक्यात 'लंपी स्किन' आजाराचे संक्रमण झाले असून सर्वाधिक जनावरांची संख्या वरुड आणि चांदुरबाजार तालुक्यात आहे. लंपी स्किन हा आजार कोरोनाप्रमाणेच एका संक्रमित जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होतो. मात्र यावर लस उपलब्ध असल्याने मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. अमरावतीत 14 पैकी 11 तालुक्यात या आजाराचे संक्रमण झाले असून सर्वाधिक जनावरांची संख्या वरुड आणि चांदुरबाजार तालुक्यात आहे. तर सर्वात कमी जनावरं चिखलदऱ्यात आहेत. 11 तालुक्यांत या आजाराने 996 जनावरांना ग्रासले आहे. जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या तालुक्यात लसीकरण मोहिम सर्वात आधी राबवण्यात आली. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्याबाहेर जाण्यापासून आळा बसेल.
अमरावतीत 14 पैकी 11 तालुक्यात 'लंपी स्किन' आजाराचे संक्रमण झाले असून सर्वाधिक जनावरांची संख्या वरुड आणि चांदुरबाजार तालुक्यात आहे. या आजारावर उपचार केल्यास जनावर 100 टक्के बरे झाल्याची माहिती जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.विजय राहाटे यांनी दिली. माशा आणि गोचिडद्वारे या आजाराचा प्रसार होत असून गाई आणि म्हशींचा गोठ्यात फवारणी करणे आणि स्वच्छत राखण्याच्या सूचना शेतकरी आणि पशुपालकांना दिल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती महापालिका क्षेत्रात लंपी स्किनचा प्रादुर्भाव अद्याप कुठेही जाणवला नसल्याची माहिती महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे यांनी दिली. यासंदर्भात पशु संवर्धन विभागाकडून येणाऱ्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे शहरी भागात काळजी घेण्यात येत असल्याचे डॉ. सचिन बोंद्रे यांनी सांगितले. जिल्ह्यात 56 हजार 500 इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला असून त्यात संक्रमण झालेल्या 47 हजार 888 प्राण्यांना ते देण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे नागरिक धास्तावले असताना जिल्ह्यात आता जनावरांवर लंपी स्किन या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. जनावरांवरील उपचार यशस्वी झाले असले तरी मच्छर, गोमाशी आणि गिनीदांपसून जनावरांना वाचवण्यात येणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. पशुपालकांनी प्राण्यांच्या गोठ्यात दोन टक्के सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करणे आवश्यक असून जनावरांना स्वच्छ वातावरणात ठेवणे तसेच संक्रमित जनावरांपासून दूर ठेवण्याचे आवाहन जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे यांनी केले.
तालुका निहाय संक्रमण व लसीकरण
चांदुरबाजार = संक्रमण - 101 ; लसीकरण - 3400
वरुड = 463 ; 7200
तिवसा = 50 ; 3500
धामणगाव रेल्वे = 87 ; 5000
मोर्शी = 8 ; 4000
दर्यापूर = 84 ; 1600
नांदगाव खंडेश्वर = 67 ; 1870
अचलपूर = 70 ; 2500
चिखलदरा = 2 ; 526
अमरावती = 37 ; 4200
एकूण = 996 ; 47888