अमरावती - अमरावती जिल्हा परिषद निवडणूक 2022 ( Amravati Local Body Election 2022 ) साठी जिल्हा परिषद सदस्यांच्या एकूण 66 पदांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्व साधारण या पदांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात हा कार्यक्रमात होणार आहे. पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण 11 तहसील स्तरावर याच दिवशी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर ( Collector of Amravati Pavneet Kaur ) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची सुरुवात प्रक्रिया सकाळी 11 वाजता होणार आहे. प्रशासनाकडून सोडतीच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्यात आली आहे. उपजिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कार्यवाही होत आहे. 16 सभेच्या अनुषंगाने आवश्यक बाबी आवश्यक बंदोबस्त आधी तजवीज करण्यात येत आहे.