अमरावती:प्रियकराने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यात चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटनाअमरावती शहरात घडली आहे.अंजनगाव सुर्जी तालुक्यातील 19 वर्षीय तरुणीही अमरावती शहरात गाडगे नगर परिसरात शिक्षणासाठी राहत होती. तिचे वरुड तालुक्यात येणाऱ्या आमनेर गावातील संकेत दिनेश मांडवकर या युवकासोबत सोशल मीडियावर पाच वर्षांपूर्वी भेट झाली. संकेत हा परतवाडा येथे विद्युत वितरण कंपनी कंत्राटी तत्वावर काम काम करतो. 19 मार्च रोजी त्याचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी दोघांचीही भेट होऊ शकली नाही. यामुळे त्याने तिला परत वाड्याला भेटीसाठी बोलावले होते.
लॉजमधील खोलीत केला वार: संकेतने तिच्यासाठी खास अंगठी भेट देण्यासाठी खरेदी केली होती. तर तिने देखील त्याच्यासाठी भेटवस्तू आणली होती. परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात असणाऱ्या टेकाडे कॉम्प्लेक्स येथील एका लॉजमधील खोलीत संकेतने तिला नेले होते. यावेळी तिच्या मोबाईल फोनवर दुसऱ्या युवकाचे सतत मेसेज येत होते. ती आपल्यासह आणखी दुसऱ्या मुलासोबत देखील असल्याचा संशय संकेतला आला. त्यामुळे प्रचंड संतापला. त्याने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधायला लावल. त्यानंतर संकेतने अचानक चाकूने तिच्या गळ्यावर आणि गालावर वार केले. यानंतर त्याने स्वतःला देखील चाकू मारून जखमी करून घेतले.