महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Unseasonal Rains in Amravati District : आता होते अन् आता नाही! अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा

शनिवारी सायंकाळच्या सुमारास (Unseasonal Rains Amravati) अमरावती जिल्ह्यातील मोर्शी चांदूरबाजार, भातकुली या तीन तालुक्यांमध्ये सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले होते. (Unseasonal Rains in Amravati District ) या गारपीटीमुळे संत्र्याचा आंबिया बहार हा पूर्णता गळून गेला आहे.(Loss of farmers due to unseasonal rains) पातसेच कांदा, कापूस, तूर, हरभरा, गहू सह भाजीपाला पिकाला प्रचंड फटका बसला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा

By

Published : Jan 9, 2022, 1:23 PM IST

Updated : Jan 9, 2022, 3:48 PM IST

अमरावती - हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल (दि. 8 जानेवारी)रोजी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. (Unseasonal Rains in Amravati District) या गारपीटीचा जबर फटका अमरावती जिल्ह्याला बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, चांदूरबाजार व भातकुली या तीन तालुक्यांमध्ये विशेष: मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे अगदी होत्याचं नव्हत झालय. फळबागा, पिकं आता चांगली बहरली होती. (Loss of farmers due to unseasonal rains) चांगल्या प्रकारच पिक आल होत. (Unseasonal Rains ) मात्र, या गारपीटीत फळबागांमध्ये फळ राहीली नाहीत आणि पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सर्वच नाहीसे झाले आहे. त्यामुळे किमाम आपण केलेला लाखो रुपयांचा खर्चतरी आपल्या पदरात पडावा या अपेक्षेने शेतकरी सरकारकडे मागणी करत आहेत.

संसार देखील उघड्यावर आले

शनिवारी सायंकाळच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील मोर्शी चांदूरबाजार, भातकुली या तीन तालुक्यांमध्ये सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले होते. या गारपीटीमुळे संत्र्याचा आंबिया बहार हा पूर्णता गळून गेला आहे. पातसेच कांदा, कापूस, तूर, हरभरा, गहू सह भाजीपाला पिकाला प्रचंड फटका बसला आहे. तर, दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील टिनाचे मजबूत छप्पर उडून गेल्याने अनेकांचे संसार देखील उघड्यावर आले आहेत.

मागील वर्षी अन् यंदाही अवकाळी च्या 'कळा'

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई या गावातील शेतकरी राहुल मंगळे यांच्या शेतात संत्रा आणि कांद्याची रोप आहे. काल आलेल्या वादळामुळे संत्र्याचा बहार पूर्णता गळून गेला आहे. गारपीटही मोठ्या प्रमाणावर आल्याने कांदा पिकाला जबर मार बसला आहे. त्यामुळे कांदा उमळून पडला आहे. आता कांदा पूर्णतः सडून जाईल अस राहुल मंगळे सांगतात. मागील वर्षीही राहुल मंगळे यांच्या शेतातील संत्र्याला आणि कांद्याला असाच अवकाळी पावसाचा फटका बसला होता. या वर्षी तरी काही तरी फायदा होईल अशी अपेक्षा होती. परंतु, काल आलेल्या वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे त्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

भाजीपाला पिकाला प्रचंड फटका

मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई परिसरात मुबलक पाणी असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतात. तो भाजीपाला ही आता उध्वस्त झाला आहे. शेतांत असलेल कोथिंबीर, पालक, टमाटर, गोबी, कांदे, सह आदी भाजीपाला डोळ्यासमोर खराब झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे.

रविवारी मध्यरात्रीही जोरदार पाऊस

रविवारी मध्यरात्रीही अमरावती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई सोबतच, विचोरी, तळेगाव तसेच चांदुर बाजार तालुक्यातील शिराळा, पुसदा राजुरा या गावात मोठ्या प्रमाणावर गारपीट व पाऊस झाला त्यामुळे या भागात देखील शेतमालाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, 14 तारखेपर्यंत असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे.

विमा मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड

दरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत व्हावी म्हणून विमा कंपन्यांकडून विम्याचे कवच दिले जाते. परंतु नुकसान झाल्यानंतर देखील विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याच शेतकऱ्यांच म्हणणं आहे. विमा कंपनी शेतकऱ्यांकडून हजारो रुपये घेते. परंतु, नुकसान झाल्यानंतरही विमाच मिळत नसल्याची शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मोठा अनर्थ आणि जीवितहानी टळली

या वादळी वाऱ्यामुळे प्रशांत बेहरे यांच्या घरावरील टीनाचे पूर्ण छप्पर उडाले आहे. या घरामध्ये मध्यप्रदेशातील 20 ते 25 मजूर वास्तव्यास होते. परंतु, काल ते शेतावर कामासाठी गेल्याने मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा - एक तिळ सात जणांनी खाल्ला हे ऐकलं! मात्र या कलाकाराने एका तीळाचे केले शंभर तुकडे;पहा हा खास रिपोर्ट

Last Updated : Jan 9, 2022, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details