अमरावती- कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यात आज रविवारी पूर्ण संचारबंदी सुरू आहे. अमरावती शहराच्या पंचवटी, राजकमल या भागात यशोमती ठाकूर यांनी भेटी दिल्या व यावेळी त्यांनी रस्त्यावर येऊन पोलिसांशी संवाद साधला.
अमरावतीत पुन्हा टाळेबंदीचे संकेत; मंत्री यशोमती ठाकूर यांचे सूतोवाच - अमरावती कोरोना घडामोडी
वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक असून अमरावती जिल्ह्यात पुन्हा 10 ते 15 दिवसांची टाळेबंदी लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूतोवाच मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.
अमरावती
वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक असून अमरावती जिल्ह्यात पुन्हा 10 ते 15 दिवसांची टाळेबंदी लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूतोवाच मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. तर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांसह त्यांनी सुनावत कोरोना नियम पाळण्यास सांगितले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या समवेत जिल्ह्याच्या कोरोना स्थितीचा आढावा दुपारी 4 वाजता त्या घेणार आहेत.