महाराष्ट्र

maharashtra

दारू दुकानदाराकडून 'दर्दी ग्राहका'चे हार घालून जंगी स्वागत, तळीरामांकडूनही हार घालत आभार

By

Published : May 8, 2020, 11:36 AM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या तिवसा येथे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग ठेवून दारूची विक्री करण्यात आली. तब्बल दीड महिन्यांनंतर दारू दुकाने उघडत असल्याने दारू दुकानावर गर्दी होत आहे. काही 'हाडाचे तळीराम' दारू दुकान उघडायच्या आतच दुकानासमोर हजेरी लावताना दिसत आहेत. आज एका ग्राहकाने स्वतः हार आणून दुकान मालकाच्या गळ्यात घातला.

अमरावती
अमरावती

अमरावती -देशात लॉकडाऊन सुरू असल्याने लाखो मजूर हजारो किलोमीटर पायपीट करून गाव गाठतानाचे चित्र दरोरोज पाहायला मिळत आहे. मात्र, अमरावतीमध्ये चक्क एका तळीरामाने फक्त दोन बाटल्या देशी दारूसाठी तब्बल १४ किलोमीटरचे अंतर पायी चालण्याचा पराक्रम केला आहे. सकाळी सहा वाजता दारू दुकानासमोर हजेरी लावून त्याने पहिला ग्राहक होण्याचा मान मिळवला. दुकानदारानेही या 'दर्दी ग्राहका'चे हार घालून स्वागत केले. यावर तळीरामानेही दुकानदाराचे हार घालून आभार मानले. जगात कोरोनाचे संकट असताना मात्र यांचा आनंद ओसंडून वाहत होता.

अमरावती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या तिवसा येथे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग ठेवून दारूची विक्री करण्यात आली. तब्बल दीड महिन्यांनंतर दारू दुकाने उघडत असल्याने दारू दुकानावर गर्दी होत आहे. काही 'हाडाचे तळीराम' दारू दुकान उघडायच्या आतच दुकानासमोर हजेरी लावताना दिसत आहेत. आज एका ग्राहकाने स्वतः हार आणून दुकान मालकाच्या गळ्यात घातला. तर, ग्राहक हा राजा असतो म्हणून दुकानदाराने सुद्धा आपल्या पहिल्या ग्राहकाच्या गळ्यात हार घालून 'ग्राहक राजा'चे स्वागत केले. हा प्रकार अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात घडला आहे.

दारुचे दुकान उघडणार या आनंदात तिवसा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातील तळीरामाने पहाटेच उठून पायी चालत सात किलोमीटरचे अंतर कापून सकाळी सहा वाजता दारुच्या दुकानासमोर हजेरी लावून पहिला ग्राहक होण्याचा मान मिळवला. मग काय.. दुकानदाराने ही आपल्या ग्राहक राजाचे तोंड भरून कौतुक करत त्याचे स्वागत केले. यावेळी ग्राहकाने देखील दुकानदाराला हार घालून ग्राहक-दुकानदाराचे नाते कायम ठेवण्याचा विश्वास दिला. ग्राहकाने दोन देशी दारूच्या बाटल्या खरेदी केल्या आणि पुन्हा सुरू झाला सात किलोमीटरचा पायी प्रवास...

कोरोनामुळे राज्यभरातील दारू विक्री ही ठप्प झाली होती. त्यामुळे तळीरामांचे 'चांगलेच हाल' सुरू होते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार शहरातील आणि गावांतील हॉटस्पॉट सोडून इतर ठिकाणी दारू विक्रीला परवानगी देण्यात आली. अमरावती शहर, वरुड व शिराळा हे क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सकाळी ८ वाजता पासून देशी दारू, बियर व वाईन शॉप दुकाने सुरू झाली. याआधी जिल्ह्यातील अनेक तळीरामांनी दारुचे दुकान फोडल्याच्याही घटना घडल्या. मात्र, दोन बाटल्या देशी दारूसाठी एका तळीरामाने केलेली १४ किलोमीटरची पायपीट त्याच्या जीवनात दारूला किती महत्व आहे सिद्ध करणारी ठरली.

ABOUT THE AUTHOR

...view details