अमरावती- अवैध गावठी दारू गाळण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असताना चांदूर रेल्वे पोलिसांकडून सतत कारवाईचा सपाटा सुरूच आहे. नुकतेच चांदूर रेल्वे तालुक्यातील गौरखेडा येथे वनविभागाच्या जागेत जंगलात वॉश आऊट मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करून गावठी दारू नष्ट करण्यात आली.
गौरखेडामध्ये ३ लाखांची दारू नष्ट, चांदूर रेल्वे पोलिसांची कारवाई - अवैध गावठी दारू
चांदूर रेल्वे पोलिसांना अवैध दारू काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर रविवारी गौरखेडा येथे फॉरेस्टच्या जागेवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी ५५ ड्रम मोहा सडवा व ४ क्विंटल इतर असा एकूण ३ लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला. तर, मोहा सडवा जागेवरच नष्ट केला.
चांदूर रेल्वे पोलिसांना अवैध दारू काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर रविवारी गौरखेडा येथे फॉरेस्टच्या जागेवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी ५५ ड्रम मोहा सडवा व ४ क्विंटल इतर असा एकूण ३ लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला. तर, मोहा सडवा जागेवरच नष्ट केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारूवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईशिवाय चांदूर रेल्वे पोलिसांनी एका घरात छापा टाकला. यात दीड लाखांचा गुटखा, तंबाखुजन्य संशयित पदार्थ व १७३ किलो प्लास्टिक जप्त केले गेले. या दोन्ही कारवाया पोलिसांनी एकाच दिवसात केल्या.