महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Life disrupted In Amravati : शहापूरचे पाणी येवद्यात शिरले, जनजीवन विस्कळीत - Amravati District

अमरावती जिल्ह्याच्या (Amravati District) शहानुर धरणात (Shahanur Dam) जलसाठा अधिक झाल्याने धरणाचे चारही दारवाजे ३० सेंटीमीटरने उघण्यात आली आहेत. शहानूर नदीच्या पुराचे पाणी येवदा गावालगतच्या गावात शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत (Life disrupted In Amravati) झाले आहे.

Life disrupted
जनजीवन विस्कळीत

By

Published : Jul 20, 2022, 1:44 PM IST

अमरावती: (Amravati District) शहानुर धरणात (Shahanur Dam) जलसाठा अधिक झाल्याने धरणाचे चारही दारवाजे ३० सेंटीमीटरने उघण्यात आली आहेत. शहानूर नदीच्या पुराचे पाणी येवदा गावालगतच्या गावात शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत (Life disrupted In Amravati) झाले आहे. पेठपुरा, खाटीकपुरा या ठिकाणी पाणी शिरल्याने अनेक लोकांच्या घरांमध्ये जीवनावश्यक वस्तू तसेच दुकानांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. लेंडी नाल्याला सुद्धा पूर आला असून नाल्यालगत असलेल्या लोकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरीकांनी वाचवलं तरुणाचा जीव:पेठपुरा येथील एक युवक जीवनावश्यक वस्तू आणण्याकरिता पाण्यामधून जात असताना त्याचा पाण्यामध्ये तोल गेला. तो बुडत असताना काही तरुणाने धाव घेऊन त्याचा जीव वाचवला. नदीचे पाणी वाढत असल्याने येवदा गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


जिल्हा परिषद शाळांना सुट्टी, वीज पुरवठा खंडीत :पुराच्या पाण्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता नदीकाठच्या गावातील जिल्हा परिषद शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
गावातील विद्युत डीपी पाण्याखाली आल्याने विद्युत विभागाच्या वतीने वीज पुरवठा तातडीने खंडित करण्यात आला आहे.

काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा :पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण असलेल्या अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ७ दारे ४५ सेंटीमीटरने उघडले आहेत. धरण ८०टक्के भरले आहे. काल रात्री दहाच्या सुमारास धरणाचा विसर्ग ५०० क्युमेक वरून ७५० ते ८०० क्युमेक एवढा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने, काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा :Flood Situation in Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती तालुक्याला पुराचा वेढा, घरांची पडझड, जनजीवन विस्कळीत

ABOUT THE AUTHOR

...view details