अमरावती -अचलपूर जवळील खैरी शिवारामधे दुपारच्या वेळी ३ वर्षाचा बिबट्या लोखंडी फासामध्ये अडकलेला असल्याचे शेतकर्याला पाहायला मिळाले होते. त्याने लगेच संबंधित वन विभागाला याची माहिती दिली. घटनास्थळावर वन विभागाचे कर्मचारी अधिकारी, आणि डाॅक्टर अशी रेस्क्यू टीम पोहचली. त्यानंतर बिबट्याला बेशुद्ध करून त्याच्या मागच्या पायामधील लोखंडी फास काढण्यात आला.
अचलपूरच्या खैरी शिवारात बिबट्या लोखंडी फासात अडकला; वन विभागाच्या अथक परिश्रमानंतर सुटका
अचलपूर जवळील खैरी शिवारामधे दुपारच्या वेळी ३ वर्षाचा बिबट्या लोखंडी फासामध्ये अडकलेला असल्याचे शेतकर्याला पाहायला मिळाले होते. त्याने लगेच संबंधीत वन विभागाला याची माहिती दिली.
अचलपूरच्या खैरी शिवारात बिबट्या लोखंडी फासात अडकला; वन विभागाच्या अथक परिश्रमानंतर सुटका
जखमी बिबट्याला सीपना वन्यजीव विभागाच्या टी. टी. सी दवाखान्यात नेण्यात आले. त्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत. लोखंडी फास लावणाऱ्यांचा वन विभागाचे पथक शोध घेत आहे. अज्ञात आरोपी विरूद्ध वन्यजीव अधिनियमन अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.