अमरावती - शहरातील छत्री तलाव परिसरातील अमरावती ते भानखेडा या रस्त्यावर रात्री फिरायला जाणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अमरावतीच्या छत्री तलाव परिसरात बिबट्याचे दर्शन - amravati chhatri lake
अमरावती शहराकडून भानखेडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. येथील छत्री तलाव परिसरात बिबट्याचे दर्शन घडले आहे.

अमरावती शहराकडून भानखेडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. या जंगलात अनेक जंगली प्राणी वास्तव्यास आहेत. सोबतच बिबट्यासुद्धा येथे वास्तव्यास आहे. भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना या बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी त्या बिबट्याला आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. अमरावती-भानखेड मार्गावर सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
दरम्यान, काही महिन्यापूर्वी छत्री तलाव परिसरातील एका गोठ्यात बिबट्या शिरून त्याने म्हशींवर हल्ला केल्याची घटना घडली होती.