महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू, अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील घटना

केकतपुर परिसरातील वन विभागाच्या जंगलातून हा बिबट्या या परिसरात आला होता. दरम्यान, आज सकाळी ७ च्या सुमारास परिसरातील एका शेतातील रखवालदार असणाऱ्या व्यक्तीला दुर्गंध आल्याने त्याने शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली.

विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

By

Published : May 7, 2020, 2:36 PM IST

Updated : May 7, 2020, 3:11 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर शेत शिवारात पाण्याच्या शोधात आलेल्या एका 6 वर्षीय बिबट्याचा १० फूट खोल असलेल्या विहरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज(गुरुवारी) समोर आली. जवळपास तीन दिवसांपूर्वी या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील घटना

केकतपुर परिसरातील वन विभागाच्या जंगलातून हा बिबट्या या परिसरात आला होता. दरम्यान, आज(गुरुवार) सकाळी ७ च्या सुमारास परिसरातील एका शेतातील रखवालदार असणाऱ्या व्यक्तीला दुर्गंध आल्याने त्याने शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली.

या घटनेची माहिती तिवसा वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू टीम बोलावून बिबट्याला बाहेर काढले. हा बिबट्या पाण्याच्या शोधासाठी आला असता विहीरीत पडल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. रेस्क्यू टीमने विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढले व जागीच त्याचे शवविच्छेदन करून घटनास्थळी बिबट्याला अग्नी देण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने गावातील व आजूबाजूच्या शेतातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

Last Updated : May 7, 2020, 3:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details