महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाॅकडाऊनने लॉन्ड्री व्यवसायिक संकटात...लग्न सराई गेल्याने मोठे नुकसान - अमरावती लाॅन्डी व्यवसाय बातमी

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये संजय पवार हे मागील 40 वर्षांपासून व्यवसाय करतात. त्यांचे मोठे नुकसान झाले असून एकढे मोठे नुकसान याआधी कशीच झाले नसल्याचे ते सांगतात. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात आमचा व्यवसाय चांगला होता मात्र तो बंद असल्याचे पवार सांगतात.

laundry-business-in-crisis-due-to-lockdown
लाॅकडाऊनने लॉन्ड्री व्यवसायिक संकटात..

By

Published : Jul 23, 2020, 5:29 PM IST

अमरावती-देशात कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. लाॅन्डी व्यवसायालाही याचा जबर फटका बसला आहे. ऐन लग्नसमारंभाच्या काळात लॉकडाऊन सुरू झाल्याने या व्यावसायिकांवर मोठे संकट कोसळले आहे. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, तरिही व्यवसाय म्हणावा तसा होत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

लाॅकडाऊनने लॉन्ड्री व्यवसायिक संकटात..

जिल्ह्यात हजारो कुटुंब लॉन्ड्री व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. मात्र, कोरोनामुळे उदर्निर्वाहाचे साधन बंद पडले. मागील दोन महिने हा व्यवसाय बंद होता. आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. दुकाने सुरू झाली आहेत. मात्र, ग्राहकांनी आता दुकानाकडे पाठ फिवली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लाॅन्डी व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

कोरोनापुर्वी दिवसाला जवळपास 100 ड्रेस प्रेस करायला येत होते. मात्र, आता ही संख्या 30 ते 35 एवढी कमी झाली आहे. त्यामुळे आम्हाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणीही लॉन्ड्री व्यावसायिकांनी केली आहे.

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये संजय पवार हे मागील 40 वर्षांपासून व्यवसाय करतात. त्यांचे मोठे नुकसान झाले असून एकढे मोठे नुकसान याआधी कशीच झाले नसल्याचे ते सांगतात. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात आमचा व्यवसाय चांगला होता मात्र तो बंद असल्याचे पवार सांगतात.

ABOUT THE AUTHOR

...view details