महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 8, 2022, 12:42 PM IST

ETV Bharat / state

ST Corporation : एसटीलाच पसंती, दिवाळीच्या काळात लालपरीने कमावले ४ कोटी

दिवाळीच्या हंगामात दिवाळी लालपरीने चार कोटीच्या जवळपास कमाई केली ( Lalpari earned close to four crores) आहे. ग्राहकांनी सुद्धा लालपरीला पुन्हा एकदा पसंती दिल्याचे दिसत आहे.

ST Corporation
लालपरी ने कमावले ४ कोटी

अमरावती : कोरोना आणि त्यानंतर कर्मचारी संप यामुळे एसटी महामंडळाची ( ST Corporation ) आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली होती. लालपरीच्या चाकांनी पुन्हा एकदा गती घेतली असून आर्थिक दृष्ट्या मजबूत होत पूर्व पदावर येत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. यावर्षीच्या दिवाळीच्या हंगामात दिवाळी लालपरीने चार कोटीच्या जवळपास कमाई केली ( Lalpari earned close to four crores ) आहे. ग्राहकांनी सुद्धा लालपरीला पुन्हा एकदा पसंती दिल्याचे दिसत आहे.

8 आगारातून जवळपास 4 कोटींचे उत्पन्न :राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाला दिवाळीच्या दिवसांमध्ये चांगले उत्पन्न प्राप्त झाले आहे. गावी जाण्यासाठी प्रवाशांनी - आधीच बुकिंग केली होती. जिल्ह्यातील ८ आगारांमधून ३ कोटी ९२ लाख ६० हजार ५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहेत. तर एकट्या अमरावती आगाराला ७६ लाख गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत प्रथमच प्रवासी वाढल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे.


प्रवाशांची लालपरीला अधिक पसंती :प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी बसने प्रवास करणे सुरक्षित मानले जाते. एसटीच्या प्रवाशी भाड्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे सर्वसामान्यांचा लालपरीचा प्रवास महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. एसटीची ही हंगामी भाडेवाढ केवळ दहा दिवसांसाठी म्हणजेच होती. त्यानुसार साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) व शिवशाहीसाठी लागू होती.

औरंगाबादसह अन्य शहरांमध्ये :नोकरीनिमित्त शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी परत येण्यास सुरूवात होते. याच कालावधीत महामंडळाने ३१ऑक्टोबर पर्यंत केलेली भाडे वाढ ही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी होती,अशा प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केल्या होत्या. शहरासह जिल्ह्यातील अनेकजण पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी राज्याच्या अन्य भागात जातात. सणांचा राजा दिवाळी असल्याने प्रत्येकाला आपल्या घरी जाण्याची ओढ लागलेली असते. खाजगी बस चे भाडे जास्त असल्याने लाल परीला प्रवाशांची अधिक पसंती मिळते.

ABOUT THE AUTHOR

...view details