अमरावती -जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा शिवारात समृद्धी महामार्गाला लागणाऱ्या मुरूमसाठी मोठमोठे खड्डे करण्यात आले आहेत. याच खड्यांमध्ये पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. पाण्याची खोली आणि गाळ असल्यामुळे मजुराला या खड्यांमध्ये आपला जीव गमवावा लागला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या महामार्गावर काम करताना मजूराचा पाय घसरून तो पाण्यात पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी खचला होता पूल -
नागपूर ते मुंबई केवळ ८ तासात हे अंतर पार करता येईल, असा मोठा समृद्धी महामार्ग तयार होतो आहे. सद्या या रस्त्याचे विदर्भातील काम अंतिम टप्यात आहे. उर्वरित काम कंत्राटदार झपाट्याने पूर्ण करीत असताना काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील सावळा रोड जवळचा पूल अचानक खचला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. यावेळी शीघ्रगतीने कामकाज करण्याच्या नादात कंत्राटदार बोगस काम करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता.
प्रशासनाकडून वारंवार माहिती दडवण्याचा प्रयत्न -