महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदर्भाच्या पंढरीत शुकशुकाट...इतिहासात पहिल्यांदाच कौडण्यपूर देवस्थान बंद - ashadhi ekadashi pandharpur news

आषाढी एकादशीला दरवर्षी लाखो वारकरी पंढरपुरात एकत्र जमतात. ज्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे शक्य नसते ते भाविक विदर्भाची पंढरी असलेल्या कौडण्यपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात.

कौडण्यपूर देवस्थान
विदर्भाच्या पंढरीत शुकशुकाट...इतिहासात पहिल्यांदाच कौडण्यपूर देवस्थान बंद

By

Published : Jul 1, 2020, 12:27 PM IST

अमरावती - आषाढी एकादशीला दरवर्षी लाखो वारकरी पंढरपुरात एकत्र जमतात. ज्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे शक्य नसते ते भाविक विदर्भाची पंढरी असलेल्या कौडण्यपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात.

विदर्भाच्या पंढरीत शुकशुकाट...इतिहासात पहिल्यांदाच कौडण्यपूर देवस्थान बंद

यंदा कोरोनाच्या सावटामुळे विदर्भाची पंढरी भाविकांविना ओस पडलीय. दरम्यान, आज पहाटे पाच भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीचे विधीवत पूजन कारण्यात आले. कोरोनाचे सावट असताना देखील दर्शनासाठी आलेले काही भाविक मुख्य प्रवेशद्वारावर पूजन करताना दिसत आहे. ४२५ वर्षाची परंपरा असलेल्या माता रुक्मिणीची पालखी काल पंढरपूरला गेलीय.

विदर्भाची पंढरी आणि माता रुक्मिणीचे माहेरघर म्हणून कौडण्यपूरची ओळख आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर तर कार्तिकी एकादशीला कौडण्यपुरात भाविकांचा मेळा असतो. मात्र यावर्षी सर्वत्र वारीचा सोहळा साध्या पद्धतीने साजरा होत आहे. तर कौडण्यपूरमध्ये देखील मंदिर बंद असल्याने इतिहासात पाहिल्यादाच आषाढी एकादशीला शुकशुकाट पाहायला मिळाला.

आज पहाटे पाच भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीचे विधिवत पूजन करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांची गर्दी टाळण्यात आली. यासाठी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details