महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदर्भाची पंढरी रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपूर आजपासुन दर्शनासाठी खुले - कौंडण्यपूर

प्रार्थनेसाठी सार्वजनिकपणे चटईचा वापर टाळावा. भक्तांनी स्वतःची चटई किंवा कापडाचा वापर करावा. सर्व धार्मिकस्थळी प्रसाद किंवा तीर्थवाटप करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रभावी स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. स्वच्छतागृहे, फरशी, जमीन यांची वारंवार स्वच्छता राखावी. सेवेकरी, कामगार, भाविकांनी वापरलेले मास्क, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट लावावी.

रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपूर
रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपूर

By

Published : Oct 9, 2021, 10:17 AM IST

अमरावती- राज्यभरातील मंदिर व प्रार्थनास्थळे गुरुवारपासून सुरू झाली. मात्र विदर्भातील अमरावती कौंडण्यपूर येथील देवी रुक्मिणी मातेचे मंदिर सुरू झालं नव्हते. तर तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेलं विदर्भाच प्रति पंढरपूर असलेलं रुक्मिणी मातेच माहेर असलेलं कौंडण्यापूरचे रुख्मिणी मातेचे मंदिर आज सकाळपासून कोरोनाचे सर्व नियम पाळत सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी या ठिकाणी भाविकांची गर्दी बघायला मिळाली. यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे पंढरपूर येथील आषाढी एकादशीला राज्यातील दहा मानाच्या पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिली आणि त्यात १० पालख्यातील विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूर येथील रुक्मिणीच्या माहेरची पालखी होती. दोन दिवस उशिरा का होईना पण मंदिर सुरू झाले आहे.

विदर्भाची पंढरी रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपूर आजपासुन दर्शनासाठी खुले

हे आहेत भाविकांसाठी नियम -

अशा सर्व ठिकाणी मास्क परिधान करणे, सॅनिटायझर, देहदूरी पाळणे आवश्यक असून, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी संबंधित ट्रस्ट, बोर्ड, यंत्रणेमार्फत तापमान तपासणी सुविधा, सॅनिटायझर आदी बाबींची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील. 65 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षापेक्षा कमी वयाची मुले यांनी शक्यतोवर घरातच राहावे. प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थापनाने त्याबाबत नागरिकांना सूचित करावे. धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे येथील कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांच्याकडून दक्षता नियमांचे काटेकोर पालन व्हावे, असे आदेशात नमूद आहे.

रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपूर

मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार कार्तिकी एकादशीचा सोहळा

दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला भाविकांचा मेळा भरतो तर कार्तिकी एकादशीला लाखो भाविकांचा मेळा कौंडण्यपुर मध्ये भरतो परंतु मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. यंदा कोरोना चे रुग्ण कमी असले तरी शासनाने घालून दिलेल्या नियमात सोहळा पार पडणार असल्याच विश्वस्त यांनी सांगितलं.

खोकताना शिष्टाचार पाळा

सार्वजनिक ठिकाणी किमान सहा फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे.चेहरा झाकलेला किंवा मास्‍कचा वापर करणे अनिवार्य आहे. हात अस्वच्छ नसले तरीही हँडवॉश किंवा साबणाने कमीतकमी 40 सेकंद धुवावे. हात अस्वच्छ झाल्यास कमीतकमी 20 सेकंद अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरावे. श्वसनासंबंधीच्या शिष्टाचाराचे पालन व्हावे. शिंकताना किंवा खोकताना प्रत्येकाने टिश्यूपेपर, हातरूमाल अथवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घ्यावी, तसेच वापरलेल्या टिश्यूपेपरची योग्य विल्हेवाट लावावी, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास संपूर्ण प्रतिबंध असून, उल्लंघन केल्याचे आढळल्यास स्थानिक प्रशासनाने दंडाची कारवाई करावी, असेही आदेशात नमूद आहे. सर्वांनी स्वत:च्या आरोग्याचे निरीक्षण करणे, तसेच आजारी व्यक्ती आढळल्यास अथवा कोरोनासदृश्य लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय सेवेशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे.

धार्मिकस्थळ व्यवस्थापनांना सूचना

धार्मिक स्थळ व्यवस्थापनाने प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्‍यासाठी सॅनिटायझर, तापमान तपासणी सुविधा उपलब्ध ठेवावी. ज्‍या व्यक्तींना कोविड-19 ची लक्षणे नाहीत अशा व्‍यक्‍तींनाच प्रवेशाची परवानगी देण्यात यावी. मास्‍क परिधान केलेल्‍या व्यक्तींनाच प्रवेश देण्‍यात यावा. प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्‍यासाठी सर्व ठिकाणी पोस्‍टर्स, भित्तीपत्रके लावावीत. श्राव्य किंवा दृकश्राव्य माध्यमांचाही वापर व्हावा.

परिसराची क्षमता पाहून प्रवेश द्यावा

धार्मिक स्थळाच्या परिसराची क्षमता पाहून विशिष्ट संख्येने प्रवेशासाठीच्या वेळा निश्चित कराव्यात. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांमध्‍ये खेळती हवा राहण्‍याच्या दृष्‍टीने गर्दी होणार नाही याची ट्रस्ट किंवा संस्‍थेने काळजी घ्यावी. भाविक भक्तांनी चपला, जोडे, पादत्राणे शक्‍यतोवर स्‍वतःच्‍या वाहनांमध्‍ये ठेवावी. गरज असेल तरच भाविकांनी वैयक्तिक, कुटुंबाची पादत्राणे एकत्रित नेमून दिलेल्या ठिकाणी ठेवावी. वाहनतळावर किंवा बाह्य परिसरात गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. परिसरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे या ठिकाणीही सोशल डिस्टन्स पाळले जाणे बंधनकारक आहे.

रांगेसाठी चिन्हांकन हवे

भाविकांना दर्शनाच्या वेळी अंतर राखून उभे राहण्यासाठी चिन्हांकन करण्यात यावे. प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावेत. दोन व्यक्तींत सहा फूटांची देहदूरी असावी. बैठक व्यवस्था असल्यासही सोशल डिस्टन्स राखले जाईल, याची खबरदारी घ्यावी. वातानुकूलन यंत्रणेचा वापर झाल्यास वातानुकूलित तापमान 24 ते 30 डिग्री सेल्सियसपर्यंत असावे. सापेक्ष आर्द्रता 40 ते 70 डिग्रीच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. ताजी हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.

मूर्ती, ग्रंथांना स्पर्श टाळा

सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळी असलेल्या पुतळे, मूर्ती, धार्मिक ग्रंथ यांना स्पर्श करण्यास परवानगी असणार नाही. मोठ्या प्रमाणावर संमेलने, परिषदांवर बंदी कायम आहे. धार्मिक संगीत, गाणी वाजवता येतील तथापि, संगीतवृंद, समूहात एकत्र येणा-या व्यक्तींना परवानगी नाही. एकमेकांना अभिवादन करताना शारीरिक संपर्क टाळावा.

प्रसाद, तीर्थवाटपाला परवानगी नाही

प्रार्थनेसाठी सार्वजनिकपणे चटईचा वापर टाळावा. भक्तांनी स्वतःची चटई किंवा कापडाचा वापर करावा. सर्व धार्मिक स्थळी प्रसाद किंवा तीर्थवाटप करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रभावी स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. स्वच्छतागृहे, फरशी, जमीन यांची वारंवार स्वच्छता राखावी. सेवेकरी, कामगार, भाविकांनी वापरलेले मास्क, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट लावावी.

ABOUT THE AUTHOR

...view details