अमरावती- मागील एक महिन्यापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी दिल्लीला निघाले आहेत. ते आज सकाळी अमरावती जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर अनेक शेतकरी हे रात्रीपासूनच तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी मध्ये मुक्कामाला होते. आज दुपारी तुकडोजी महाराज यांचं दर्शन घेऊन हे हजारो कार्यकर्ते नागपूर आणि तेथून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत, याबाबतचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी..
किसान सभेचे शेकडो शेतकरी दिल्लीच्या वाटेवर; आज मोझरीत होणार सभा
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते दिल्लीकडे जात आहेत.
किसान सभेचे शेकडो शेतकरी दिल्लीच्या वाटेवर
आज मोझरीत होणार सभा-
किसान सभेचे शेतकऱ्यांची आज मोझरी मध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर हे कार्यकर्ते नागपूर आणि नागपूरवरून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत. चार तारखेला हे आंदोलक शेतकरी दिल्लीमध्ये धडक देणार असल्याची माहिती या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे.
Last Updated : Jan 3, 2021, 10:58 AM IST