महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय लाटण्याऐवजी स्वतः ठोस कार्य करा, किरण पातूरकरांचा रवी राणांना टोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय लटण्याऐवजी स्वतः काहीतरी ठोस कार्य करा, असे म्हणत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे प्रमुख किरण पातूरकर यांनी आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला.

किरण पातूरकरांचा रवी राणांना टोला

By

Published : Jul 25, 2019, 10:40 AM IST

अमरावती - दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय लटण्याऐवजी स्वतः काहीतरी ठोस कार्य करा, असे म्हणत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे प्रमुख किरण पातूरकर यांनी आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. शहरात होणारे वैद्यकीय महाविद्यालय माझ्या प्रयत्नाने आल्याची बोंब रवी राणांनी केल्याचे पातूरकर म्हणाले.

किरण पातूरकरांचा रवी राणांना टोला

अमरावती शहरात 15 दिवसांपूर्वी शासनाची एक समिती वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेची पाहणी करण्यासाठी येऊन गेली. या समितीने कोंडेश्वर परिसरात 27 एकर ई-क्लास जमीन योग्य असल्याचा शेरा दिला. मंगळवारी याच संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे प्रमुख किरण पातूरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत बैठक बोलाविली होती. या बैठकीचे निमंत्रण नसतानाही आमदार रवी राणा हे उपस्थित होते. यावेळी आमदार राणा यांनी पालकमंत्री बोंडे यांच्या प्रयत्नाने अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्याल आले असल्याचे म्हटले होते. मात्र, दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी स्वत:च्या प्रयत्नाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले असल्याचे प्रसिद्धीपत्र काढले आहे. राणांच्या या कृतीचा मी निषेध नोंदवित असल्याचे पातूरकर यांनी सांगितले.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत येणासाठी आमच्या कृती समितीचे प्रयत्न यशस्वी झाले. यासाठी विद्यमान पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख यांचे सहकार्य मिळाले. आम्हाला सहकार्याची गरज आहेच. आमदार राणा यांनी वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत होण्यासाठी प्रयत्न केले तर आम्हाला ती मदत ठरेल. आम्ही त्यांचे स्वागत करू मात्र, काहीही न करता श्रेय लुटण्याची त्यांची कृती चुकीची आहे. राणा यांनी भातकुली परिसरात एमआयडीसीमध्ये उद्योग आणावे, बंद पडलेली विजय मिल सुरू करावी अशी अनेक ठोस कामे करून दाखवीवी असेही पातूरकर म्हणाले.

अमरावती विमानतळाच्या विकास कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन झाले असताना, विमानतळासंदर्भात आता मुंबईत जाऊन बैठक घेण्याचा अजब प्रकारही आमदार राणा यांनी केला. केंद्र सरकारने अमरावतीत विमानतळाला परवानगी नाकरल्यावर आपण राज्य सरकारकडे गेलो. राज्य शासनाने अमरावती विमानतळाला परवानगी दिली. त्यानंतर कारण नसताना राणा हे अमरावती विमानतळासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी करतात. हा साफ चुकीचा आणि कोणालाही न पटणारा प्रकार आहे. दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय लाटण्याऐवजी आमदार राणा यांनी स्वतः चे काही काम करून दाखवावे असेही किरण पातूरकर म्हणाले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे डॉ. बबन बेलसरे, डॉ. जयंत पांढरीकर आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details