अमरावती- हातात शस्त्र घेऊन किरण नगर परिसरात दहशत पासरविणाऱ्या दोन गुंडांच्या भीतीमुळे परिसरातील नागरिकांनी काल (गुरुवारी) फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी दोन्ही गुंडांच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले असून गुंडांचा शोध घेत आहेत.
अमरावतीत गुंडांच्या धास्तीने नागरिकांची पोलीस ठाण्यात धाव - पोलीस निरिक्षक
प्रज्वल जंगले आणि दादू वसंत पाटील हे दोन गुंड किरण नगर परिसरात शस्त्र काढून दहशत पसरवित आहेत. सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास या दोघांनी परिसरातील जेष्ठ नागरिकांना विनाकारण मारहाण केली होती. या प्रकरणाची तक्रार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी हे दोघेही परिसरात आले आणि हातात शस्त्र घेत आमच्या विरोधात पोलिसात तक्रार देणाऱ्यांना पाहून घेऊ, अशा शब्दात धमकावल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांत दिली आहे.
प्रज्वल जंगले आणि दादू वसंत पाटील, अशी या गुंडांची नावे आहेत. हे दोघेही परिसरात शस्त्र काढून दहशत पसरवित आहेत. सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास या दोघांनी परिसरातील जेष्ठ नागरिकांना विनाकारण मारहाण केली होती. या प्रकरणाची तक्रार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी हे दोघेही परिसरात आले आणि हातात शस्त्र घेत आमच्या विरोधात पोलिसात तक्रार देणाऱ्यांना पाहून घेऊ, अशा शब्दात धमकावल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांत दिली आहे.
या दोघांचाही किरण नगर परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास आहे. परिसरातील शारदा महिला मंडळाच्या महिला सदस्यांना मारहाण करण्याचा प्रकारही या दोघांनी केला आहे. पोलिसांनी या दोघांना अनेकदा अटक करूनही हे दोघे सहज सुटून बाहेर येतात. आता त्यांचा त्रास असहनिय झाल्याने किरण नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. पोलीस निरीक्षक चोरमले यांच्याकडे नागरिकांनी सामूहिक तक्रार दिली. पोलिसांनी प्रज्वल जंगले आणि दादू वसंत पाटील यांच्या आई वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ते दोघे नेमके कुठे दडून बसले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.