अमरावती- अकोला येथील उद्योजक किशोर खत्री हत्याकांडातील प्रमुख आरोपी रणजीत सिंग चुंगडे याचा सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अमरावती जिल्हा कारागृहात 13 जुलै 2017 पासून रणजीत सिंग चुंगडे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
अकोला: किशोर खत्री हत्याकांडातील प्रमुख आरोपीचा अमरावती कारागृहात मृत्यू
15 जुलै 2015ला अकोल्यातील उद्योजक किशोर खात्री यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आरोपी रणजीत सिंग चुंगडे याचा अमरावती जिल्हा कारागृहात सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
15 जुलै 2015 ला अकोल्यातील उद्योजक किशोर खात्री यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यावर 13 जुलै 2017 पासून रणजीत सिंग चुंगडे अमरावती जिल्हा कारागृह होता. आज पहाटे छातीत दुखत असल्याचे त्याने कारागृहातील पोलिसांना सांगितले. यानंतर कारागृह अधीक्षक कांबळे यांनी रणजीतला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
रणजीत हा अकोल्यातील कुख्यात गुंड होता. राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातही रणजीत हा आरोपी होता. विदर्भातील टाडाचा पहिला गुन्हा रणजीत सिंह याच्यावर दाखल झाला होता.
TAGGED:
किशोर खत्री हत्याप्रकरण