महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 2, 2021, 10:24 AM IST

Updated : Jul 2, 2021, 10:45 AM IST

ETV Bharat / state

मेळघाटातील अनेक भागातील पिकांवर 'केसाळ' अळीचा प्रादुर्भाव

काही दिवसांपूर्वीच मेळघाटातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतात पेरणी केली. मेळघाटामध्ये सर्वाधिक शेतकरी हे मका पिकाची लागवड करतात. सध्या मक्याचे पीक हे वर आले आहे.

Kesal Larvae effect on crops in melghat amravati
मेळघाटातील अनेक भागातील पिकांवर 'केसाळ' अळीचा प्रादुर्भाव

अमरावती -जिल्ह्यातील मेळघाट भाग पहाडी आहे. त्यामुळे येथे शेती कसने म्हणजे जिकरीचे काम आहे. त्यात अनेकदा पाऊस जास्त होतो. त्यामुळे हमखास उत्पन्नाची हमीदेखील नाही. त्यामुळे येथील शेतकरी नेहमी विविध संकटात सापडत असतो. पेरणीला अवघे काही दिवस झाले असतानाच येथील शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक याबाबत माहिती देताना

शेतकऱ्यांच्या पदरी संकट -

काही दिवसांपूर्वीच मेळघाटातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतात पेरणी केली. मेळघाटामध्ये सर्वाधिक शेतकरी हे मका पिकाची लागवड करतात. सध्या मक्याचे पीक हे वर आले आहे. मात्र, अशातच चिखलदरा तालुक्‍यातील जंगल भागातील जवळपास सात ते आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या केसाळ अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा येथील शेतकरी संकटात सापडला आहे.

हेही वाचा -अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्याने पावसाअभावी आठ एकर कपाशीवर फिरवला ट्रॅक्टर

जिल्हा कृषी अधीक्षक काय म्हणाले?

पिकांवर पडलेल्या 'केसाळ' अळीमुळे बळीराजाच्या पदरात आणखी संकट पडले आहे. या अळीचा मोठा प्रादुर्भाव असल्याने वर आलेल्या पिकांचे पाने ही अळी कुरतडत आहेत. या अळीचा सर्वाधिक प्रभाव हा चिखलदरा तालुक्यातील जंगल परिसरातील गावांमध्ये दिसून आला. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करून शेतात बियाण्याची पेरणी केली. मात्र, त्या शेतात या अळीचा प्रादुर्भाव नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. विजय चव्हाळे यांनी सांगितले.

एका झाडावर पाचपेक्षा अधिक केसाळ अळ्या -

मेळघाटातील जंगली भागात आक्रमण केलेल्या या केसाळ अळीचा प्रादुर्भाव हा मोठा आहे. जवळपास पिकाच्या एका झाडावर पाचपेक्षा अधिक या अळ्या दिसून येत असल्याने झाडाचे पाने या अळ्यांनी कुरतडले आहे. त्यामुळे झाडांची वाढ देखील थांबली आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती फवारणी करण्याचा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुबलक पाऊसही झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अमरावतीच्या दर्यापुर तालुक्यातील एका शेतकऱ्याने पावसाअभावी आपल्या आठ एकर कपाशीवर ट्रॅक्टर फिरवण्याची घटनाही समोर आली आहे.

हेही वाचा -पेपर देण्यासाठी नेटवर्कच्या शोधात दुसऱ्या गावात पायी जात असलेल्या बहिणींवर रानडुकराचा हल्ला

Last Updated : Jul 2, 2021, 10:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details