अमरावती -मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी कोरोनाचे नियम पाळून आजपासून सुरू करण्यात येत आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला परवानगी देण्याची मागणी केली होती. त्याचं अनुषंगाने आता कोरोनाचे नियम पाळून व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.
दीड महिन्यांपूर्वी कोरोनाचा आलेख कमी झाला. दऱयाखोऱ्यात वसलेल्या मेळघाट परिसरात चिखलदरा पर्यटन सुरू करण्यात आले होते. मात्र, अवघ्या ३ दिवसातच चिखलदरा व मेळघाट व्याघ्र प्रकल्पात होणारी जंगल सफारी मात्र पुन्हा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे चिखलदरात जंगल सफारी करणारे गाईड व जिप्सी चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.