अमरावती - दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथील तलावाचे पाणी पावसाळ्यात घराजवळ व वस्ती शिरत असल्याने ग्रामस्थनी ग्रामपंचायतच्यावतीने महसूल विभाग व जलसंधारण विभागाला अनेक वेळा निवेदन दिले. परंतु त्याची कुठलीही दखल घेतली नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी तलावातील टेकडीवर बसून जलसमाधी आंदोलन केले. सात तासानंतर बचाव पथकाच्यावतीने या महिलांना सुखरूप बाहेर करण्यात आले आहे.
जलसंधारण विभागाचे पत्र प्राप्त मिळाल्यावर आंदोलन मागे -
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लोटवाडा ग्रामपंचायतच्यावतीने तलावाच्या समस्येचा ठराव घेऊन तो जलसंधारण व महसूल विभागाला देण्यात आला होता. मात्र, सुस्त प्रशासनाने डोळेझाक केल्याने संतप्त झालेल्या महिला व पुरुषाच्यावतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तीन महिला व चार पुरुष असे एकूण 9 जणांनी सहभाग होता. प्रशासनाची नजर चुकून आंदोलक पहाटेच्या अंधारात गाव तलावातील जागेवर येऊन बसले होते. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयातून रेस्क्यू टीमही आंदोलनस्थळी पाठवण्यात आली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. दरम्यान, जलसंधारण विभागाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर ते आंदोलन मागे घेण्यात आले. या महिलांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अमरावती जिल्हा शोध व बचाव पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली.
हेही वाचा -खासदार नवनीत राणांकडून पुन्हा कोरोना नियमांचे उल्लंघन; विनामास्क सार्वजनिक ठिकाणी गणपतीची महाआरती