अमरावती- रंगारी गल्ली येथील जगदीश्वर मंदिरातून निघालेल्या आणि १२० वर्षांची परंपरा असणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेने आज अमरावती दुमदुमली. उत्तकल नृत्यनिकेतनच्या चमूने रथासमोर ओडिसी परंपरेतील नृत्य सादर करून अमरावतीकरांचे रथयात्रेकडे लक्ष वेधले.
जगन्नाथ रथयात्रेने दुमदुमली अमरावती; ओडिसी नृत्याविष्कारने वेधले लक्ष - जगन्नाथ रथयात्रा
१२० वर्षांची परंपरा असणाऱ्या रंगारी गल्ली येथील जगदीश्वर मंदिरातून निघालेल्या जगन्नाथ रथयात्रेने आज अमरावती दुमदुमली. उत्तकल नृत्यनिकेतनच्या चमूने रथासमोर ओडिसी परंपरेतील नृत्य सादर करून अमरावतीकरांचे रथयात्रेकडे लक्ष वेधले.
सायंकाळी ५ वाजता रंगारी गल्ली येथील जगदीश्वर मंदिरातून रत्रयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर सक्करसाथ, जवाहर गेट येथून जयस्तंभ, मालवीय चौक मार्गाने ही रथयात्रा निघाली. जयस्तंभ चौक येथे उत्तकल नृत्य निकेटनच्या चमूने मंगलाचरण सादर करून नृत्यसेवा दिली. जगन्नाथाच्या रथासमोर नृत्यसेवा देण्याला ओडिसी परंपरेत खूप मान आहे.
उत्तकल निकेतनच्या चमूतील लहान-मोठ्या कलावंतांनी सादर केलेल्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले. 'गोविंदा जय गोविंदा' असा जयजयकार करीत निघालेल्या या रथयात्रेने अमरावती शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. रत्रयात्रेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.