अमरावती -लालखडी परिसरातील जामेआ नगरातील इस्लामिया बुस्ताने फातेमा लिलबना या मदरशात मदरसा प्रमुखाने मदरशातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे दोन वेळा लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार मागील आठवड्यात पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर उघडकीस आला होता. याप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी मुफ्ती जिया उल्ला खानला नागपूर मधून अटक केल्यानंतर सह आरोपी असलेली शिक्षिका फिरदोसला सुद्धा मदरशातून अटक करण्यात आली आहे.
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांत तक्रार दाखल होण्याच्या काही तास अगोदरच मुख्य आरोपी फरार झाला होता. सहआरोपी फिरदोस हिच्यावर मुलीला आरोपीकडे सोपवण्याचा आरोप आहे. ती मागील चार दिवसांपासून फरार होती.