अमरावती -राष्ट्रीय महामार्ग 6 वरून दररोज शेकडो ट्रकमार्फत कन्हान रेतीची वाहतूक होत असते. अशाप्रकारे वाळू वाहणाऱ्या नऊ ट्रकवर तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री आयपीएस अधिकारी श्रमिक लोढा यांनी स्वत: घटनास्थळावर दाखल होत नऊ ट्रक जप्त केले.
अमरावतीत एकाच रात्रीत रेतीचे 9 ट्रक ताब्यात; आयपीएस अधिकाऱ्याची 'धडक' - amravati sang mining news
राष्ट्रीय महामार्ग 6 वरून दररोज शेकडो ट्रकमार्फत कन्हान रेतीची वाहतूक होत असते. अशाप्रकारे वाळू वाहणाऱ्या नऊ ट्रकवर तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री आयपीएस अधिकारी श्रमिक लोढा यांनी स्वत: घटनास्थळावर दाखल होत नऊ ट्रक जप्त केले.

आयपीएस अधिकारी लोढा यांनी जिल्ह्यातील वरुड येथे कन्हान रेतीचे 35 ट्रक पकडून धडक कारवाई केली होती. शुक्रवारी रात्री पुन्हा तिवसा पोलीस स्टेशन हद्दीतून वाहतूक करणाऱ्या एकूण 9 रेतीच्या ट्रकवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या वाहनांमध्ये मालवाहू ट्रक व टिप्पर वाहनांचा समावेश असून त्यांच्या परवान्याबाबत चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पुढील तपास तिवसा पोलीस स्टेशन, महसूल व आरटीओ विभाग करत आहे.
वाळू माफियांचे धाबे दणाणले
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग-6 वर दररोज शेकडो ट्रक रेतीची वाहतूक करण्यात येते. मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमधून ही वाहतूक सुरू असते. दरम्यान याची गुप्त माहिती आयपीएस अधिकारी श्रमिक लोढा यांना मिळाली. त्यानंतर संबंधित कारवाई करत नऊ ट्रक जप्त करण्यात आले आहेत.