महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंजनगाव सुर्जीत पाण्यासाठी हाहाकार ; जीवन प्राधिकरण विषयी जनतेत संताप - पाण्याचा अपुरा पुरवठा

अनेक वर्षांपासून अंजनगाव सुर्जी शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून अंजनगाव सुर्जी शहराला व्यवस्थितपणे पाणीपुरवठा केल्या जात नसल्यामुळे पाण्याअभावी जनतेची चांगलीच गैरसोय झाली आहे.

Insufficient water supply to Citizens in Anjangaon Surji City
पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अंजनगाव सुर्जी शहरातील नागरिकांचे हाल

By

Published : Mar 14, 2020, 8:22 AM IST

अमरावती - अंजनगाव सुर्जी शहरात गेल्या आठ दिवसांपासून पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. जनतेत जीवन प्राधिकरणाविषयी संताप व्यक्त केला जात आहे. अंजनगाव सुर्जी या जोड शहराला जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अनेक वर्षांपासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो आहे. गेल्या आठ दिवसांपासून अंजनगाव सुर्जी शहराला व्यवस्थितपणे पाणीपुरवठा केला जात नसल्यामुळे पाण्याअभावी जनतेची चांगलीच गैरसोय होत आहे.

पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अंजनगाव सुर्जी शहरातील नागरिकांचे हाल...

हेही वाचा....कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील रिक्षाचालकाची भन्नाट शक्कल

शहरातील अनेक भागांमध्ये पाणी मिळत नाही, अशी अवस्था निर्माण आहे. तर काही भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जनतेचे कमी पाण्यामुळे हाल होत आहे. जीवन प्राधिकरणाच्या नियोजनाच्या अभावामुळे गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. जीवन प्राधिकरणाचे योग्य नियोजन नसल्यामुळे शहरांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये अतिशय मनमानी कारभार सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर शहरातील जीवन प्राधिकरणाचा कारभार कसा सुरू आहे, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे अंजनगाव सुर्जी शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जात असताना, या कार्यालयात एकही शाखा अभियंता नाही.

स्थानिक कार्यालयांमध्ये नियमित अधिकारी हजर राहत नसल्यामुळे जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली. वेळोवेळी जनतेनी निवेदने दिली. परंतु अधिकारी योग्य ती दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी संपूर्ण शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली, यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.

हेही वाचा...पुण्यातून धूम ठोकलेले कोरोना संशयित कुटुंब अद्याप बेपत्ता

पाण्याच्या समस्येमुळे महिलांना सर्वाधिक त्रास सन करावा लागत आहे. शुक्रवारी संतापाच्या भरात काही महिलांनी जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या मांडला. तसेच उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याला शहरातील पाण्याच्या समस्याविषयी प्रश्न विचारले. काही नागरिक व महिलांनी अधीक्षक अभियंता यांना मोबाईलवर संपर्क करून स्थानिक शाखेच्या कारभाराची व पाण्याच्या समस्याची माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब समजून घेतली नाही, तर फार मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details