अमरावती -कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. कोरोनाच्या भीतीपोटी आपलीच माणसं आपल्यापासून दुरावल्या गेली आहे. मात्र सामाजिक माणूसकी जोपासणारे अजूनही आपले काम चोख पद्धतीने पार पाडतांना पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना अमरावतीमधून पुढे आली आहे.
अमरावतीतील एका मनोरूग्णाच्या व्यवस्थेसाठी संत गाडगे महाराज वृद्धाश्रमाचा पुढाकार - अमरावती मनोरूग्ण
शहरातील पंचवटी उड्डाणपुलावर गेल्या अनेक महिन्यांपासून एक व्यक्ती वास्तव्यास होती. या व्यक्तीच्या पुनर्वसनाबद्दल अनेक व्यक्तींनी चिंता व्यक्त केली होती. पण या व्यक्तीला मदत करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. परंतु श्री संत गाडगे महाराज वृद्धाश्रम वलगांव मित्रपरिवारच्या वतीने त्या व्यक्तीला गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या सहायाने वलगांव येथील संत गाडगे महाराज वृद्धाश्रमात नेण्यात आले.
![अमरावतीतील एका मनोरूग्णाच्या व्यवस्थेसाठी संत गाडगे महाराज वृद्धाश्रमाचा पुढाकार अमरावती मनोरूग्ण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12404940-thumbnail-3x2-amra.jpg)
'यांनी' केली मदत
शहरातील पंचवटी उड्डाणपुलावर गेल्या अनेक महिन्यांपासून एक व्यक्ती वास्तव्यास होती. या व्यक्तीच्या पुनर्वसनाबद्दल अनेक व्यक्तींनी चिंता व्यक्त केली होती. पण या व्यक्तीला मदत करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. परंतु श्री संत गाडगे महाराज वृद्धाश्रम वलगांव मित्रपरिवारच्या वतीने त्या व्यक्तीला गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या सहायाने वलगांव येथील संत गाडगे महाराज वृद्धाश्रमात नेण्यात आले. त्या व्यक्तीचे केसकर्तनकरुन त्यांची अंघोळ करून देण्यात आली. सध्या ही व्यक्ती संत गाडगे महाराज वृध्दाश्रम येथे वास्तव्यास आहे. या व्यक्तीला कायमस्वरूपी आधार मिळवून देण्यासाठी वृद्धाश्रम प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यावेळी संत गाडगे महाराज वृद्धाश्रमाचे संचालक डॉ. कैलास बोरसे, पूर्ण बोरसे, योगेश तायडे, प्रथमेश पिंपळकर, अनिकेत दहातोंडे, रोहीत पानबुडे, ओम लेणेकर, ऋषभ धंदर, चेतन बोबडे, मयूर सोळंके, मल्हार लेणेकर उपस्थित होते.