महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत-अमेरिकेत 'त्या' ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी - exchange and cooperative agreement

भारत आणि अमेरिका या दोन देशात झालेल्या एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. 'बेसिक एक्सचेंज अँड कोओपरेटिव्ह अग्रीमेंट' या नावाने हा करार ओळखला जातो. या कराराअंतर्गत अमेरिका ही संरक्षण दृष्ट्या संवेदनशील अशी महत्त्वाची माहिती भारताशी शेअर करणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ.शैलेंद्र देवळानकर यांनी दिली.

agreements between india and US
भारत-अमेरिकेत 'त्या' ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी

By

Published : Oct 28, 2020, 5:21 AM IST

अमरावती - भारत आणि अमेरिका या दोन देशात झालेल्या एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. 'बेसिक एक्सचेंज अँड कोओपरेटिव्ह अग्रीमेंट' या नावाने हा करार ओळखला जातो. या कराराअंतर्गत अमेरिका ही संरक्षण दृष्ट्या संवेदनशील अशी महत्त्वाची माहिती भारताशी शेअर करणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ.शैलेंद्र देवळानकर यांनी दिली.

भारत-अमेरिकेत 'त्या' ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी
अमेरीकेने भारतासमोर केलेला हा करार जगातील मोजक्याच देशांसोबत केला आहे. कारण अमेरिका या बाबतीत खूप सिलेक्टिव्ह आहे. 2016 नंतर भारत व अमेरिका यांच्या संरक्षण संबंधांमध्ये टप्प्या-टप्प्याने जो विकास झाला, हा करार त्याचा बिंदू आहे, असे देवळानकर म्हणाले. या कराराद्वारे अमेरिकेने उपग्रहांच्या माध्यमातून मिळवलेली माहिती भारताला मिळेल. याचा उपयोग हा प्रामुख्याने भारताचे दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्रांना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.भारत अमेरिका यांच्या झालेल्या या करारासाठी निवडण्यात आलेली जी वेळ आहे ती वेळ अत्यंत महत्वाची आहे. सामरिक दृष्टीने याला महत्त्व आहे. चीनसाठी हा करार म्हणजे एक संदेशच म्हणावा लागेल. मागील सहा महिन्यांपासून सीमेवरील परिस्थिती तनावपूर्ण आहे. चीनने सिमेवर मोठा शस्त्र साठा आणला आहे. कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते. अशा परिस्थितीत झालेला हा करार म्हणजे भारताचे यश आहे, असे देवळानकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details