महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटात आढळले 'इंडियन बुलफ्रॉग', निसर्ग प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण - amravati latest news

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात 'इंडियन बुलफ्रॉग' या प्रजातीच्या पिवळ्या रंगाचे बेडकाचे वास्तव्य असलेले डबके आढळले आहे. यामुळे निसर्ग प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

indian bullfrog
पिवळे बेडूक

By

Published : Jun 15, 2020, 12:42 PM IST

Updated : Jun 16, 2020, 9:44 AM IST

अमरावती- विदर्भाचे नंदनवन अशी ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलात विविध प्रजातीचे प्राणी, वन्य जीव, पक्षी हे पर्यटकांच्या नेहमीच आवडीचा विषय ठरत आहे. आता त्यात पिवळ्या रंगाचे 'इंडियन बुलफ्रॉग' या प्रजातीच्या बेडकांचे टोळके हे पहिल्या पावसामुळे तयार झालेल्या पाण्याच्या डबक्यात उड्या मारताना दिसून आले आहेत. यामुळे निसर्ग प्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

माहिती देताना निसर्ग प्रेमी
पिवळ्या रंगाचे बुलफ्रॉग प्रजातीचे बेडूक पावसाने साचलेल्या पाण्याच्या डबक्यात मेळघाटात दिसून आले आहे. याला 'इंडियन बुल फ्रॉग' किंवा सोन्या बेडूक, असे म्हणतात. शास्त्रीय भाषेत होप्लोब्राटाकस टायगिरिनस नावाने हे बेडूक ओळखले जातात. यातील पिवळ्या रंगाची नर बेडके असून ही भारतातील बेडकाची सर्वात मोठी प्रजाती आहे. पश्चिम घाटात या बेडकांची अवैध विक्री होते. तसेच गोव्यामध्ये या बेडकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

मेळघाटातील नयनरम्य निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटाकांची मोठी रिघ येथे लागलेली असते. पण, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमध्ये काही अंशी दिलासा जरी मिळाला असला तरी पर्यटनाला अजूनही बंदी आहे. त्यामुळे यंदा मेळघाटात पर्यटकांविना ओस पडलेलेल आहे.

हेही वाचा -अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Last Updated : Jun 16, 2020, 9:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details