महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका; मशागतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरची भाडेवाढ - Tractor fare hike Amravati

देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असतानाच यातून शेतकरीही सुटले नाही. डिझेलची मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्यामुळे आता शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरची मोठी भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे, शेतकरी संकटात सापडला आहे.

Diesel price hike affect Amravati farmers
मशागत यंत्र भाडेवाढ अमरावती

By

Published : May 31, 2021, 4:06 PM IST

अमरावती -देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असतानाच यातून शेतकरीही सुटले नाही. डिझेलची मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्यामुळे आता शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरची मोठी भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे, शेतकरी संकटात सापडला आहे.

माहिती देताना शेतकरी आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

बैलजोडीच्या माध्यमातून मशागत

मागच्या तुलनेत डिझेलच्या किमती वाढल्याने आता ट्रॅक्‍टर चालकांनी देखील ट्रॅक्‍टरची भाडेवाढ केली. सध्या पेरणीचा हंगाम तोंडावर असल्यामुळे शेतकरी आपल्या शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे करत आहे. परंतु, डिझेलच्या वाढत्या किंमती आणि ट्रॅक्टरची झालेली भाडेवाढ यामुळे अनेक शेतकरी आता पुन्हा एकदा शेतामध्ये घाम गाळताना दिसत आहे. पुन्हा एकदा शेतकरी आपल्या बैलजोडीच्या माध्यमातून शेतीत मशागतीची कामे करत आहे.

हेही वाचा -खळबळजनक! मेळघाटात आढळला कुजलेला मानवी सांगाडा

डिझेल नव्वदच्या पार गेले, तर पेट्रोलनेही शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. आधीच लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात आहे. पेरणी पूर्वीच शेतमालाच्या किमतीही मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. अशात आता शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या यंत्रांची भाडेवाढ देखील वाढलेली आहे. पूर्वीच्या तुलनेत प्रत्येक यंत्रामागे शंभर, दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे, ट्रॅक्टरने मशागत करणे शेतकऱ्यांना परवडत नाही, मग बैलजोडीने मशागत कराव का? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

बैलजोडीने मशागतीसाठी होत आहे विलंब

शेतकरी हे ट्रॅक्टरने शेतामध्ये शेतीच्या मशागतीची कामे करत होते, परंतु वाढत्या डिझेलच्या किमतीमुळे ट्रॅक्‍टरची भाडेवाढ झाली. त्यामुळे, शेतकरी आता बैलजोडीच्या साहाय्याने आपल्या शेतात घाम गाळताना दिसतो. परंतु, बैलजोडीमुळे शेतीच्या मशागतीला मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे. त्यात मान्सून काही दिवसांवर आल्याने शेतीची मशागत होईल की नाही? याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही.

पेरणीपूर्वीच शेतमालाच्या किंमती घसरल्या

सध्या पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांची लगबग ही बी-बियाणे खरेदी करण्यासाठी आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे हवे म्हणून शेतकरी आपल्या घरातील शेतमाल बाजारपेठेत विकायला नेत आहे, परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून शेतमालाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे, त्याचाही जबर फटका शेतकऱ्यांना बसताना दिसून येते.

बी-बियाणे व खतांच्या वाढल्या किमती

आधीच नापिकीने हैराण असलेल्या शेतकऱ्यांसमोर यंदा बियाणे, खत दरवाढीचे मोठे संकट उभे आहे. मागील वर्षी 2 हजार 500 रुपयांपर्यंत मिळणारी सोयाबीनची बॅग या वर्षी मात्र शेतकऱ्यांना 3 हजार 500 ते 4 हजार रुपयांपर्यंत विकत घेण्याची वेळ आली आहे. ज्या वेळी शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीन विकले त्या वेळेस तीन, चार हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता, परंतु आता प्रचंड भावाने शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी करावे लागत आहेत.

हेही वाचा -जळालेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह; अमरावती जिल्ह्यातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details