अमरावती -जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आदी यंत्रणा काटेकोर प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना गती देत आता जिल्हा परिषदेच्या विश्राम गृह येथे कोविड केअर तथा समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहे. यानंतरही आवश्यक तिथे उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. या कोविड केअस सेंटरचे उद्धाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनीही दक्षता नियम पाळून स्वत:सह इतरांचीही सुरक्षितता जोपासावी, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
संकटकाळात जबाबदारीने वागा -
माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज कोविड केअर सेंटरचे लोकार्पण होत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील दीड वर्षापासून शासन, महसूल, पोलीस विभागासह आरोग्य विभाग आदी कोरोनाला थोपविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. सध्याची वेळ अतिशय कठीण असून, या संकटकाळात प्रत्येकाने जबाबदारीने वागणे अत्यंत गरजेचे आहे. सोबतच स्वत:ची व इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे व कोरोना त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी विविध प्रतिबंध लावण्यात आले आहे. नागरीकांनीही प्रशासनाच्या या प्रयत्नांना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी यशोमती ठाकूर यांनी यावेळो केले.
म्युकरमायकोसिसबाबत जनजागृती -