महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 13, 2019, 8:39 AM IST

ETV Bharat / state

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त योगगुरू रामदेवबाबा हे १९ ऑक्टोबरला अमरावतीमध्ये उपस्थित राहणार आहेत. तसेच पुढील सात दिवस सामाजिक, शैक्षणीक, आरोग्य, शेती, धार्मिक, समाज प्रबोधन कीर्तन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

अमरावती - आयुष्यभर आपल्या भजनातून आणि ग्रामगीतेतून अखिल विश्वाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाला आज (रविवारी) सुरूवात होत आहे. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत तुकडोजींच्या महासमाधीवर पहाटे चार वाजता ब्रम्हमुहूर्तावर तीर्थस्थापना व सामुदायिक ध्यानाने प्रारंभ झाला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

हेही वाचा - सत्तेत असताना युवकांसाठी किती रोजगार आणले? गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल

पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने तुकडोजी महाराज यांची महासमाधी आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आली होती. महाद्वार व गुरुकुंज आश्रम हे आकर्षण रोषणाईने फुलून गेले होते. आज सकाळी तीर्थ स्थापना व सामुदायिक ध्यानाने या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला. सामुदायिक ध्यानानंतर महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा गावातून काढण्यात आली. यावेळी ढोल, पताका, लेझीम ही वाद्ये वाजवत मुलांनी सहभाग घेतला.

पुढील सात दिवस सामाजिक, शैक्षणीक, आरोग्य, शेती, धार्मिक, समाज प्रबोधन कीर्तन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून १९ ऑक्टोबरला लाखो भक्त हे तुकडोजी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहनार आहेत. कार्यक्रमाला योगगुरू रामदेवबाबा हे सुद्धा उपस्थित राहणार आहे.

हेही वाचा - राज ठाकरेंच्या सभेवर पुन्हा पावसाचे सावट?

ABOUT THE AUTHOR

...view details