महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवसा शहरात २ हजाराची लाच घेताना वीजवितरणच्या २ कर्मचाऱ्यांना अटक - bribe Arrest Tivasa

दोन हजाराची लाच घेताना तिवसा शहरातील दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

वीजवितरण
वीजवितरण

By

Published : Feb 2, 2021, 5:17 PM IST

अमरावती -दोन हजाराची लाच घेताना तिवसा शहरातील दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. लाईनमन नंदू मानकर व कंत्राटी कामगार वैभव चिंचखेडे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा -अमरावती : थकबाकीदारांविरोधात महावितरणी धडक मोहीम

नेमके काय आहे प्रकरण?

तक्रारदार हॉटेल मालकाने मे २०१९ मध्ये आपल्या हॉटेलमध्ये घरगुती वीज मीटर बसवले होते. परंतु, हॉटेलमध्ये व्यावसायिक मीटर बसवणे गरजेचे होते. ही बाब सदर आरोपींच्या लक्षात आली. त्यांनी हॉटेल मालकाला मे २०१९ पासून बिल हे व्यावसायिक मीटरचेच देणार असल्याचे सांगितले. ते बिल घरगुती मीटर प्रमाणे देण्यासाठी ३ हजाराची लाच आरोपींनी मागितली होती. तडजोडी अंती २ हजार रुपये स्वीकारण्याचे आरोपींनी मान्य केले. दरम्यान, हॉटेल व्यावसायिकाने या दोघांची तक्रार केल्याने आज दोन्ही आरोपींना २ हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, विभाग अमरावती परिक्षेत्र तपास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र जेधे, न.पो.शी प्रमोद धानोरकर, पो.शी. पंकज बोरसे, पो.शी. राजेश कोचे, पो.शी. शैलेश कडू आदींनी केली.

हेही वाचा -मेळघाटातील सलोना गाव होणार आत्मनिर्भर! महिलांच्या आर्थिक विकासातून स्थलांतराला बसेल आळा

ABOUT THE AUTHOR

...view details