अमरावती :अमरावती जिल्ह्यातअमरावती बाजार समिती नंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती करिता रविवारी मतदान व लगेच मतमोजणी पार पडली, या बाजार समितीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने 15 ही जागांवर उमेदवार निवडून आले आहे, या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला मोठा धक्का बसला असून केवळ व्यापारी आणि हमाल मतदार संघातील तीन जागांवर समाधान मानावे लागले,
काँग्रेसचा फडकला झेंडा :अचलपूर बाजार समितीमध्ये 18 संचालक पदासाठी 48 उमेदवार रिंगणात होते. आज रविवारी सकाळी आठ वाजता पासून मतदानला सुरुवात झाली. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान आटोपल्रे , त्यानंतर लगेच पाच वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. रात्री जवळपास पूर्ण मतदार संघाचे निकाल लागले. या निवडणुकीमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पॅनल मधील तीन उमेदवार निवडून आले, तर अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी वर्चस्व प्राप्त करीत या बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे.
काँग्रेसचा जल्लोष :अमरावती जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक ची बाजार समिती म्हणून बाजार समिती ओळखल्या जाते, त्यामुळे यावेळी काँग्रेसच्या विरोधात प्रहारच्या शेतकरी पॅनलने देखील जोरदार तयारी केली होती. परंतु त्यांना यश मिळाले नाही. बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे 15 संचालक मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत. यामध्ये सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून राजेंद्र गोरले ,अमोल चीमोटे, रवींद्र पाटील, सतीश पाटील, ज्ञानदेव पाटील, सुधीर रहाटे, गोपाल लहाने इतर मागासवर्गीय मतदार संघातून बाबुराव गावंडे, महिला मतदार संघातून, वर्षा कैलास आवारे, प्रतिभा ठाकरे, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून अनिल पवार, ग्रामपंचायत मतदार संघातून राजेश काळे, अतुल वाठ, अजिंक्य अभ्यंकर, अमोल बोरेकार मोठ्या फरकाने निवडून आले. यामध्ये प्रहारच्या शेतकरी पॅनलचे सुभाषचंद्र अग्रवाल, सतीश व्यास, पोपट घोडेराव विजय झाले आहेत, निकालानंतर सहकार पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला.
हेही वाचा - Building Collapsed in Bhiwandi : भिवंडी इमारत दुर्घटना; इमारत मालकाला अटक