महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाडका श्वान हरवल्यानं चिमुकल्याच्या जिवात नाही जीव, शोध घेऊनही न सापडल्यानं त्यानं... - Abu qais Sheru missing

तिवसा तालुक्यातील मोझरी गावात राहणाऱ्या शहा कुटुंबात 15 महिन्यापूर्वी एका मादी श्वानाने एका पिल्लाला जन्म दिला. शफीक शहा यांच्या 7 वर्षांच्या अबुकैसची या पिल्लासोबत चांगली मैत्री झाली होती. पुढे चालून त्याला शेरू नावही त्याने दिले. परंतु, त्याचा मित्र शेरू चार दिवसांपूर्वी हरवला, त्यामुळे अबुकैसचे जेवण बंद झाले आहे. शेरूच्या आठवणीत तो एवढा बुडाला आहे की, त्याने आपल्या अभ्यासावरही दुर्लक्ष केले आहे.

Abu qais Sheru missing
अबुकैस श्वान हरवला

By

Published : Oct 31, 2021, 10:17 PM IST

Updated : Nov 1, 2021, 9:31 AM IST

अमरावती -आपण आपल्या घरातील व्यक्तीला किती जीव लावतो याची मर्यादा नसते. त्याच्याशी लागलेला प्रेमाचा लळा तुटता तूटत नाही. सोबत राहणारी घरातील व्यक्ती जर अचानक सोडून गेली तर? असा विचारही मनात आला तर, आपली घालमेल झाल्याशिवाय राहत नाही. जर तुमच्या घरात लहान मुलगा असेल आणि त्याचा मित्र कुत्रा असेल आणि तो अचानक हरवला तर, त्या मुलाच्या मनावर किती परिणाम होतो हे त्या मुलालाच माहीत. अशीच एक घटना अमरावतीत घडली आहे.

माहिती देताना अबुकैस, त्याचे वडील आणि मोठे बाबा

हेही वाचा -औरंगाबाद : गोळ्या-बिस्कीट व्यापाऱ्यांची पावणेचार लाखाची बॅग लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

तिवसा तालुक्यातील मोझरी गावात राहणाऱ्या शहा कुटुंबात 15 महिन्यापूर्वी एका मादी श्वानाने एका पिल्लाला जन्म दिला. शफीक शहा यांच्या 7 वर्षांच्या अबुकैसची या पिल्लासोबत चांगली मैत्री झाली होती. पुढे चालून त्याला शेरू नावही त्याने दिले. परंतु, त्याचा मित्र शेरू चार दिवसांपूर्वी हरवला, त्यामुळे अबुकैसचे जेवण बंद झाले आहे. शेरूच्या आठवणीत तो एवढा बुडाला आहे की, त्याने आपल्या अभ्यासावरही दुर्लक्ष केले आहे. शेरू गेल्यापासून तो रात्री झोपत नसल्याचेही त्याचे कुटुंब सांगतात.

चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलीस शोधून काढतात, मग माझ्या शेरूलाही पोलीस काका शोधून काढेल, या बाभळ्या आशेपोटी अबुकैसने आपल्या वडिलांना थेट पोलिसात तक्रार द्यायला लावली. तो ऐकत नसल्याने बापानेही थेट पोलीस स्टेशन गाठून मुलाच्या समाधानासाठी शेरू हरवल्याची तक्रार पोलिसात दिली.

अबुकैसचा शेरूवर प्रचंड जीव. तो रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याच्या सहवासात राहायचा. कोरोना काळात तर अगदी अबुकैस आणि शेरू एकमेकांना सोडायचे नाही. शाळा बंद होती तेव्हा तर, तासानतास शेरू आणि अबुकैस एकमेकांसोबत खेळायचे. शेरूला त्याच्या घरात जेवायला नेऊन देणे, पाणी टाकणे, रोज अंगोळ घालून देणे, बाहेर फिरायला नेणे आदी काम अबुकैस करत होता. परंतु, चार दिवसांपूर्वी घराचा दरवाजा उघडा राहाला आणि शेरू घराबाहेर पडला तेव्हापासून मात्र तो परतलाच नाही.

आपला शेरू आता परत येईल, मग येईल, उद्या येईल या आशेपोटी अबुकैसने आपल्या वडिलांना घेऊन गावातल्या गल्लोगल्ली फिरून आपल्या लाडक्या शेरूचा शोध घेतला. शोधूनही आपला शेरू सापडत नाही म्हणून त्याने आपल्या वडिलांना शेरू हरवल्याचे पोस्टर लावायला लावले. अबुकैस शेरूच्या आठवणीत एवढा तल्लीन झाला आहे की, ज्या ठिकाणी त्याचा शेरू बसायचा त्या ठिकाणी अबुकैस तासनतास बसून आपला शेरू येईल याकडे आशाळभूत नजरेने पाहत आहे. अनेकवेळा माणसाच्या वागण्याने त्याचा लळा तुटतो. पण, प्राण्यांच्या प्रामाणिकतेपुढे लावलेला लळा मात्र तुटत नाही. हे पुन्हा एकदा शेरू आणि अबूकैसच्या जिवापाड मैत्रीतून पुढे आल आहे.

हेही वाचा -औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, एसटीला राज्यसरकारमध्ये समाविष्ट करण्याची मागणी

Last Updated : Nov 1, 2021, 9:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details