अंजनगाव सुर्जी (अमरावती) - एकीकडे देशभरात कोरोनाचे थैमान सुरू असताना संचारबंदीच्या काळातही गुटखा तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संचारबंदीच्या काळातही गुटखा तस्करी; पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात - amravati news
एकीकडे देशभरात कोरोनाचे थैमान सुरू असताना संचारबंदीच्या काळातही गुटखा तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव येथे गुरुवारी एकजण आपल्या दुचाकीने गुटखा विक्री करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. रहिमापूर चिंचोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार जमील शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंजनगाव सुर्जी येथील संदीप बन्सीलाल रॉय (वय ३५) याला त्याच्या दुचाकी वाहनासह (एमएच 27 बीएस 7305) ताब्यात घेतले. त्याच्याजवळ तंबाखूजन्य नजर गुटखा व इतर अशी तीन लहान भरलेली पोती पोलिसांनी जप्त केली. एकूण गुटका ७,८०० रूपये व दुचाकी गाडी असा एकूण माल ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.