अमरावती : जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत गेल्या पाच वर्षांत वेगवेगळ्या कारणाने जिल्हाभर चर्चेत आहे. आता नगराध्यक्ष संजय पोफळे व त्यांचे सहकारी नगरसेवकांनी प्रशासकीय यंत्रणेतील गैरकारभाराविरोधात मंगळवारी रात्री ८ वाजल्यापासून ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. सकाळी अधिकारी कार्यालयीन वेळेवर आले असता, ते बाहेर पटांगणात उभे आहेत. प्रशासकातील अधिकार्यांवर सेवा हमी कायदा लावून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आंदोलक नगरसेवकांनी लावून धरली आहे.
अमरावती : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षांचे नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण - nandgaon khandeshwar grampanchayat news
प्रलंबित कामासंदर्भात नगरपंचायत नगराध्यक्ष यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. कोरोनाच्या नावाखाली विकासाला झाकण्याचा प्रकार नगरपंचायतकडून चालू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
शासकीय कामात कोणीही अडथळा निर्माण केला तर, तातडीने गुन्हे दाखल होतो. तर, प्रशासकीय अधिकारी कामात वेळकाढूपणा व दिरंगाई करतात, अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, असा सूरही नागरिकांमधून उमटत आहे. शहरातील नागरिकांची बांधकाम परवाने प्रलंबित, महसूल बुडणे, पाणीपुरवठा, लिकेज, मुरूम टाकणे, नवीन नळ कनेक्शन देणे, महत्त्वाची कामे प्रलंबित ठेवणे. देयक न मिळाल्याने कचरा व्यवस्थापन विलंब, चांदी प्रकल्पावर वा ओएचपी मोटर काम प्रलंबित, नवीन पाणीपुरवठा पाइप टाकणे सन २०२०-२१ कर विभागाचे रिपोर्ट बनवणे प्रलंबित, प्रधानमंत्री आवास योजनेतील देयके देणे प्रलंबित, दलित वस्तीतील कामात तांत्रिक अडचणी, रस्ता विकास अनुदान न देणे, अग्निशामक गाडी खरेदी बाबतची टेंडर ओपन करणे अशी अनेक कामे प्रलंबित आहेत.
याप्रकरणी नगरपंचायतीच्या प्रलंबित कामाचा पाठपुरावा आदी मागण्याकरता नगरपंचायत नगराध्यक्ष यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. कोरोनाच्या नावाखाली विकासाला झाकण्याचा प्रकार नगरपंचायतकडून चालू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावेळी नगरसेवक अरुण लायवर, पाणीपुरवठा सभापती प्रमोद पिंजरकर, शोभा ब्राह्मणवाडे, उपनगराध्यक्ष प्रिती इखार, धनराज रावेकर, सतीश पटेल आदी उपस्थित होते.