अमरावती जिल्ह्यात दिवाळीत गवळणची परंपरा कायम;कोरोनातही नाही पडू दिला खंड - अमरावती गवळण परंपरा
अमरावती जिल्ह्यात दिवाळीत गवळणची परंपरा कायम राखण्यात आली. कोरोना काळातही यामध्ये खंड पडू दिला नाही. गवळण परंपरेच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते व विविध योजनांची माहिती दिली जाते.
दिवाळीत गवळणची परंपरा कायम
अमरावती - दिवाळी सणाच्या निमित्ताने पूर्वी गावोगावी निघणाऱ्या गवळणी कालांतराने बंद झाल्या असल्या तरी अमरावती जिल्ह्यातील अनेक गावामधील ही परंपरा ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शीसह अनेक गावात ही गवळण काढली जातात. यामध्ये माणसांला स्त्रीचा वेष परिधान करून नृत्य केले जाते. कोरोना काळातही या पारंपरिक परंपरेला ग्रामीण भागातील नागरिकांनी खंड पडू दिला नाही. या गवळणीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले जाते.
दिवाळीच्या निमित्ताने निघनारी गवळनीची परंपरा आज कायम आहे. यामध्ये माणसाला स्त्रीचा वेष परिधान करतात.धनत्रयोदशीच्या रात्री पासून किमान ४ दिवस दररोज रात्री गवळण काढण्यात येते. स्त्री रूपी माणूस आपल्या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात.
शासकीय योजनाची माहिती -
गवळणी सोबतच शासकीय विविध योजनांची माहिती सुद्धा या गवळणीच्या माध्यमातून गावकऱ्यांना देण्यात येते. या मागचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी असा असतो.
८४ दिव्यांची ज्योत-
गवळणी सोबत झेंडाई म्हणून ८४ दिव्यांची ज्योत जाळण्यात येते. संपूर्ण गावभर ही झेंडाई फिरवून घरोघरी त्याची पूजा केली जाते. जवळपास ४०० वर्षांपूर्वीपासून ही परंपरा जोपासण्यात येत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
Last Updated : Nov 15, 2020, 8:27 PM IST