अमरावती -घरात एकटी असलेल्या तरुणीचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना जिल्ह्यातील खोलापूर पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. सुरज आठवले (वय 30) असे आरोपीचे नाव आहे.
अमरावतीत २२ वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण; आरोपीस अटक - Suraj Athavale arrested in Kholapur
घरात एकटी असलेल्या तरुणीचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना जिल्ह्यातील खोलापूर पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. सुरज आठवले (वय 30) असे आरोपीचे नाव आहे.
प्रतिकात्मक
22 वर्षीय पीडित तरुणी घरी एकटी होती. ही संधी साधून आरोपीने घरात प्रवेश करत तिचे लैंगिक शोषण केले. घटनेनंतर पीडित तरुणीने कुटुंबाला आपली आपबीती सांगितली. त्यानंतर कुटुंबाने खोलापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुरज विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
हेही वाचा -अमरावतीमध्ये दहा महिन्यांनंतर पडदा उघडला, सिनेमागृह सुरु