अमरावती- जिल्ह्यातील मेळघाट परिसरात धारणी मांडवा रोडवर एका दिवसाच्या नवजात मुलीला नदीत फेकल्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. यात या नवजात मुलीचा मृत्यू झाला आहे.
एक दिवसाच्या नकोशीला फेकले नदीत; अमरावतीच्या धारणीमधील घटना - amaravati news
मेळघाट परिसरात अनैतिक संबंधांतून किंवा मुलगी नको या विचारातून नवजात मुलीला कापडात गुंडाळून नदीत फेकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात या नवजात मुलीचा मृत्यू झाला आहे.

अनैतिक संबंधांतून किंवा मुलगी नको या विचारातून या नवजात मुलीला कापडात गुंडाळून नदीत फेकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नदीच्या बाजूला काही लहान मुले खेळत असताना त्यांना हे नवजात अर्भक दिसले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल देखील उपस्थित झाले. नवजात शिशु हे मुलगी असल्याने तिला नदीत फेकल्याचे कृत्य करण्यात आल्याची चर्चा देखील जोर धरत आहे. दरम्यान, या घटनेने मेळघाट परिसरात बेटी बचाव चा नाऱ्याचा फज्जा मात्र उडालेला आहे.