महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ST workers strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा छोट्या व्यावसायिकांना फटका, अनेकांवर उपासमारीची वेळ - एसटी कर्मचारी आंदोलनाचा परिणाम

लहान मोठे खाद्यपदार्थ विकणारे हे छोटे मोठे व्यावसायिक आज रत्यावर आले आहे. यामागे कारण एकच आहे एसटी बसचा संप. अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकात व्यवसाय करणारे हे लोक कोणी यापैकी भजी विकत, कोणी पाण्याची बॉटल, तर कोणी खारे दाणे यावरच यांच्या घरची चुल पेटते. मात्र आता एसटी संप असल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. आणि याचा परिणाम या व्यावसायिकांवर झाला आहे.

अनेकांवर उपासमारीची वेळ
अनेकांवर उपासमारीची वेळ

By

Published : Nov 16, 2021, 1:01 AM IST

Updated : Nov 16, 2021, 1:22 AM IST

अमरावती -राज्य परिवहन एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी एसटी कर्मचारी (ST workers strike) मागील पाच ते सहा दिवसांपासून राज्यभर आंदोलन करत आहे. त्यामुळे आपल्या एसटीचे चाके थांबले आहे. तर दुसरीकडे एसटीची चाके थांबल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची लूट होत आहे. मात्र एसटी डेपो परिसरात व्यवसाय करून उपजीविका भागवणाऱ्या व्यावसायिकांवरही (ST workers strike impact) या संपामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा छोट्या व्यावसायिकांना फटका

अनेकांवर उपासमारीची वेळ

एसटी आगारात पाणी बाटल्या, इतर लहान मोठे खाद्यपदार्थ विकणारे हे छोटे मोठे व्यावसायिक आज रत्यावर आले आहे. यामागे कारण एकच आहे एसटी बसचा संप. अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकात व्यवसाय करणारे हे लोक कोणी यापैकी भजी विकत, कोणी पाण्याची बॉटल, तर कोणी खारे दाणे यावरच यांच्या घरची चुल पेटते. मात्र आता एसटी संप असल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. आणि याचा परिणाम या व्यावसायिकांवर झाला आहे. एसटीही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी तर आहेच. परंतु या जीवनवाहिनीवर पोट भरणारेही अनेक जीव आहेत. मग एसटीमध्ये प्रवाशांना दोन पैसे मागून पोट भरणारे गोरगरीब भिकारी, असो की एसटीमध्ये फिरवून गाणे म्हणून लोकांचे मनोरंजन करणारे कलाकार, असो यांनाही याचा फटका बसला आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ती एसटी पुन्हा थांबली आहे. परंतु एसटीचे चाके थांबले असले तरी हजारो कुटुंबाचे पोट भरणेही थांबले आहे.

शिवथाळीचे मोठे नुकसान

मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघावा ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. हीच अपेक्षा या छोटे व्यावसायिकांची आहे. जेणेकरून एसटीचे चाके पुन्हा रस्त्यावर धावले. त्यामुळे यांचाही पोटापाण्याचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय राहणार नाही. अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानकात दररोज 200 शिवभोजन थाळी जेवण बनवले जाते. परंतु प्रवासी नसल्याने 100 हून अधिक शिवभोजन थाळी लोकांना वाटल्या जात नसल्याची माहितीही उपाहारगृह चालकांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा -ST STRIKE UPDATE कारवाईची नोटीस मागे घ्या, अन्यथा एसटी महामंडळाला टाळे ठोकू - प्रवीण दरेकर

Last Updated : Nov 16, 2021, 1:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details