अमरावती -जिल्हात गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे आज अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात बैठक घेतली. यावेळी त्यांनी वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता, यावर चिंता व्यक्त केली. तसेच पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जायचे नसेल, तर कोरोनाचे नियम पाळा लागतील, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
सोमवारी वाढले तबल २३५ रुग्ण -
आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अधिकारी वर्गांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्या. कोरोनाची लाट पुढे येऊ नये, यासाठी कोरोना नियम पाळा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अमरावती जिल्हात दररोज कोरोना रुग्ण वाढत आहे. काल तब्बल २३५ रुग्ण वाढल्याने जिल्हात आतापर्यंत २३२९३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी २२२६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४२४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
योग्य ती खबरदारी घेतलीच पाहिजे -