अमरावती -जिल्हा नियोजनात नमूद कामे विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. पूर्वनियोजनात काही बदल आवश्यक असेल, तर 14 फेब्रुवारीपूर्वी निधीसाठीचे परिपूर्ण नियोजन सादर करावे. त्यानंतर मात्र प्राप्त निधीतून सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. निधी अखर्चित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
14 फेब्रुवारीपर्यंत नियोजन करा -
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीला निधीत काही प्रमाणात कपात करण्यात आली होती. मात्र, ‘मिशन बिगेन अगेन’नंतर ती वाढविण्यात आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार यंदा 219 कोटी 18 लाख रूपये प्रस्तावित नियतव्यय आहे. आदिवासी क्षेत्रातील उपयोजनांसाठी 78 कोटी व सामाजिक न्याय योजनांसाठी 101 कोटी रुपयांची तरतूद आहे. गतवर्षी 271 कोटी 40 लाख रूपये निधी मंजूर होता. त्याप्रमाणे सर्व विभागांकडून विहित वेळेत पूर्ण होणाऱ्या आवश्यक कामांचे प्रस्ताव प्राप्त करून घेऊन निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. मात्र, निधी अखर्चित राहिल्यास ती संबंधित विभागप्रमुखाची जबाबदारी असेल. त्यामुळे सर्व विभागांनी त्यांचे नियोजन 14 फेब्रुवारीपूर्वी देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात -
जिल्ह्यात नियमित वीजपुरवठ्यासाठी महावितरणने सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवून कामे केली पाहिजे. वीजवहन यंत्रणा वारंवार बंद पडून पुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबले पाहिजे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. याबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊन तत्काळ कार्यवाही व्हावी. जिल्ह्यात ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरबाबत 15 मार्चपूर्वी आवश्यक दुरुस्ती किंवा नवी यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबतही कार्यवाही व्हावी. सुरळीत वीजेसाठी 250 ते 300 ट्रान्सफॉर्मर नवे लागणार आहेत. त्यासाठी निधी देण्यात येईल. ‘ट्रान्सफॉर्मर ऑन व्हील’ ही संकल्पना राबवून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तत्काळ बदलून पुरवठा सुरळीत करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाईल, असेही पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले. कृषी पंपासाठी शासनाने हितकारी धोरण अंमलात आणले आहे. त्याचा लाभ अधिकाधिक शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण -